शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलाच्या निधनानंतर त्याच्या पार्थिवालाच धरुन बसले होते शेखर सुमन, म्हणाले, “मुलाला अग्नी देण्यापेक्षा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 30, 2024 | 7:30 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
shekhar suman son death

मुलाच्या निधनानंतर त्याच्या पार्थिवालाच धरुन बसले होते शेखर सुमन, म्हणाले, "मुलाला अग्नी देण्यापेक्षा..."

अभिनेता शेखर सुमन सध्या ‘हिरामंडी – द डायमंड बाजार’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ते सध्या खूप व्यस्त आहेत. या वेबसीरिजच्या निमित्ताने त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टींचे खुलासे झाले. शेखर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या दु:खद प्रसंगाबद्दल त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. शेखर यांना दोन मुलं होती. पण त्यांचा मोठा मुलगा आयुषचे कमी वयातच निधन झाले. त्यामुळे शेखर यांना मोठा धक्का बसला होता. त्याबद्दल ते आता व्यक्त झाले आहेत. (shekhar suman son death)

शेखर हे टेलिव्हिजन क्षेत्रातील खूप प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनी अनेक मालिका, कार्यक्रमांमध्ये दिसून आले होते. तसेच त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील केले होते. मध्ये अनेक वर्ष ते अभिनयापासून लांब होते. मात्र आता ते सुप्रसिद्ध निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी- द डायमंड बाजार’ या वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. या सीरिजचे प्रमोशन सध्या सुरु असून सर्व कलाकार यामध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत. त्यावेळी शेखर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या कठीण प्रसंगाबद्दल सांगितले आहे.

आणखी वाचा – Video : नणंदेबरोबर ऐश्वर्या रायचं वैर, पण त्याचा राग अभिनेत्रीने भाचीवर काढला अन्…; ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बिचारी मुलगी…”

View this post on Instagram

A post shared by Shekhar Suman (@shekhusuman)

शेखर यांचा मोठा मुलगा आयुष 11 वर्षाचा असतानाच जगाचा निरोप घेतला होता. त्याला नॅशनल ऑर्गनायजेशन फॉर रेअर डिसऑर्डर या रोगाने पीडित होता. या रोगाचा परिणाम थेट हृदयावर होतो. त्यामुळे शेखर यांनी या रोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलाला गमावल्याचे दु:ख त्याने बोलून दाखवले आहे.

आणखी वाचा – Video : भावाचं बोलणं ऐकून बॉबी देओल ढसाढसा रडू लागला अन्…; देओल कुटुंबियांना देव पावला असं का म्हणाला सनी?, व्हिडीओ व्हायरल

याबद्दल त्यांनी सांगितले की, “हा रोग खूप दुर्मिळ असून लाखांमध्ये केवळ एखाद्यालाच होतो. भारतामध्ये केवळ असे चार रोगी आहेत. याला उपचार म्हणजे हृदय प्रत्यारोपण आहे”. मुलाची आठवण काढताना तो पुढे म्हणाला की, मी जेव्हा आयुषला रुग्णालयात घेऊन गेलो तेव्हा तो माझ्या कुशीत होता. पण जेव्हा डॉक्टरांनी पाहिलं तेव्हा तो या जगात नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले”.

पुढे तो म्हणाला की, “त्याचे पार्थिव घेऊन मी रात्रभर जागा होतो. मी खूप रडलो. माझी पत्नी अलकाची अवस्थादेखील खूप खराब झाली होती. मुलाच्या पार्थिवाला अग्नी देण्यापेक्षा भयंकर असे आई-वडिलांसाठी काहीही असू शकत नाही, “असेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा – लग्नानंतर नवऱ्यासह पाँडिचेरीला फिरायला गेली शिवानी सुर्वे, निसर्गाच्या सानिध्यात रमलं मराठमोळं जोडपं, फोटो व्हायरल

दरम्यान शेखर सध्या नवीन सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सीरिजमध्ये त्यांच्याबरोबर मनीषा कोइराला, ऋचा चढ्ढा, संजीदा शेख, सोनाक्षी सिंन्हा, फरदीन खान हे कलाकार दिसणार आहेत.  

Tags: actorshekhar sumanyoung son death
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
01 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

१ मे रोजी मेष, कर्क, तूळसह मकर राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार, तुमच्या भाग्यात काय? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.