मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलच्या यादीत एका जोडप्याचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे. १ फेब्रुवारी रोजी शिवानी व अजिंक्य यांचा शाही विवाहसोहळा झाला. शिवानी व अजिंक्यच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नानंतर ही जोडी चर्चेत असलेली पाहायला मिळाली. दोघांनी त्यांच्या लग्नाबाबत कोणताच खुलासा न करता थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांसह गुडन्यूज शेअर केली. लग्नानंतर ही जोडी अनेकदा एकत्र एन्जॉय करताना दिसली. (Shivani Surve And Ajinkya Nanaware)
लग्नानंतर शिवानी व अजिंक्य त्यांचे लग्नांनंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत. दोघेही त्यांच्या शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून फिरायला जात असतात. अजिंक्यने बायकोबरोबर वेळ घालवतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा ही जोडी त्यांची सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. शिवानी व अजिंक्यने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फिरतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.
शिवानी व अजिंक्य सध्या पुड्डुचेरी येथे फिरायला गेले आहेत. पॉंडिचेरी येथे फिरतानाचे अनेक फोटो शिवानीने शेअर केले आहेत. पॉंडिचेरी येथील काही अँटिक वस्तू व अँटिक जागांबरोबरचे अनेक फोटो शिवानीने शेअर केले आहेत. तसेच तेथील खाद्यपदार्थांचाही तिने आस्वाद या फोटोंमध्ये घेतलेला पाहायला मिळत आहे. शिवानी व अजिंक्यच्या या रोमँटिक व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिवाय त्यांच्या या फोटोंना पसंती दर्शविली आहे.
शिवानी छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ मालिकेमुळे व ‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे प्रसिद्धीझोतात आली. तर अजिंक्य सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत अजिंक्य अद्वैत ही भूमिका साकारताना दिसत आहे. सध्या अजिंक्य मालिकेच्या चित्रीकरणातून ब्रेक घेत बायकोसह वेळ घालवताना दिसत आहे.