सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या नऊ वर्षांनंतर ‘मधुबाला’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री गरोदर, व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज, चाहत्यांकडून शुभेच्छा

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 14, 2024 | 2:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
drashti dhami pregnancy

लग्नाच्या नऊ वर्षांनंतर 'मधुबाला' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री गरोदर, व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज, चाहत्यांकडून शुभेच्छा

हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दृष्टी धामी. ‘गीत’ या मालिकेतून तिला हिंदी मालिकाविश्वात एक वेगळी ओळख मिळाली. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘मधुबाला’ या मालिकेमध्ये तिने साकारलेली भूमिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. दृष्टी सध्या खूप काळापासून अभिनयापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मालिकांमध्येच काम करत असताना ती नीरजबरोबर लग्नबंधनात अडकली. आता लग्नाच्या ९ वर्षांनंतर तिच्याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. (drashti dhami pregnancy )

मालिकांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री आता लवकरच आई होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. दृष्टी लग्नाच्या नऊ वर्षानंतर तिने आई होणार असल्याचे सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितले आहे. याबद्दल तिने एक व्हिडीओ शेअर केला असून तिचा पतीदेखील दिसून येत आहे.

आणखी वाचा – “जेमिनी असेल घरी तर…”, बायकोने वाढदिवसादिवशी प्रेम व्यक्त करताच सिद्धार्थ चांदेकरने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला, “आनंदाची…”

View this post on Instagram

A post shared by Drashti Dhami ???? (@dhamidrashti)

या व्हिडीओमध्ये दृष्टी व पती नीरज एकत्र उभे असून खूप खुश असलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात एक पोस्टर आहे. त्यावर ‘गुलाबी असू शकतो किंवा निळा असू शकतो. पण आम्ही खूप खुश आहोत. ऑक्टोबर २०२४. आम्हाला आशिर्वाद, प्रेम, कॅश व फ्रेंच फ्राइज पाठवत राहा”. त्यांच्या या व्हिडीओमध्ये दृष्टीचे संपूर्ण कुटुंब दिसून येत आहे.

आणखी वाचा – सुरुची अडारकर व पियुष रानडे यांनी घरातच तयार केली बाग, व्हिडीओ पाहून कलाकारांकडूनही कौतुक, पाहा व्हिडीओ

त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांनी व कलाकारांनीही खूप पसंती दर्शवली आहे. अभिनेत्री कृती कामरा, रुबिना दिलैक, करण ग्रोव्हर, हिना खान यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रुबिनाने प्रतिक्रिया देत म्हंटले की, “माझ्याकडे नवीन बाळासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मिळतील”. तसेच इतरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दृष्टी २१ फेब्रुवारी २०१५ साली नीरज खेमकाबरोबर लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नासाठी कुटुंब, मित्रपरिवार व कलाकार असे सगळे उपस्थित होते. सोशल मीडियावर ती अनेकदा पती व कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करत असते. आता बाळाच्या येण्याच्या बातमीने तिच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे.

Tags: drashti dhamipregnanttelevision actressvideo
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Mrunmayee Deshpande gave sarcastic reply

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या गावातील घरावर चढले तिचेच दोन्ही पाळीव श्वान, खेळत राहिले अन्…; कमेंट करणारीला दिलं सडेतोड उत्तर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.