रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुरुची अडारकर व पियुष रानडे यांनी घरातच तयार केली बाग, व्हिडीओ पाहून कलाकारांकडूनही कौतुक, पाहा व्हिडीओ

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 14, 2024 | 1:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
suruchi adarkar and piyush ranade home garden

सुरुची अडारकर व पियुष रानडे यांनी घरातच तयार केली बाग, व्हिडीओ पाहून कलाकारांकडूनही कौतुक, पाहा व्हिडीओ

‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे हे दोघेही मराठी लोकप्रिय कलाकार आहेत. दोघांच्याही लग्नाची चर्चा जोरदार रंगली होती. त्यांच्या लग्नानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पियुष व सुरुची थेट लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना लग्न केल्याची माहिती दिली. याआधी दोघांनीही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली कधीही माध्यमांमध्ये दिली नव्हती. मात्र लग्न करुन फोटो सोशल मीडियावर अपलोड करताच त्यांच्या नात्याबद्दलची माहिती सर्वांना मिळाली. दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. खासगी आयुष्यातील अनेक व्हिडीओ ते शेअर करत असतात. (suruchi adarkar and piyush ranade home garden)

सुरुची व पियुष यांनी लग्नाचे फोटो शेअर केले त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी अनेकदा एकेमकांबरोबरचे फोटोदेखील शेअर केले. आता पुन्हा एकदा त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही घरामध्ये एक बाग तयार करताना दिसत आहेत. घराच्या बाल्कनीमध्ये कुंड्यांमध्ये झाडं लावत असून काम करण्याचा हा सुखदायी अनुभव असल्याचेही सांगितले आहे.

आणखी वाचा – अहिल्यादेवी घरात नसताना दामिनीने घेतली त्यांची जागा, पारू आदित्यला फिरायला घेऊन गेल्यानंतर गनीलाही बेदम मारलं अन्…

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????????? N ???????????????????????????? (@suruchiadarkar)

झाडांनी बाल्कनी सजवल्यानंतर व्हिडीओ पोस्ट करत “आमची प्रेमाची स्वतंत्र बाग’ असे कॅप्शनही दिले आहे. तसेच “तुम्हालाही झाडांची लागवड करायला आवडते का?”, असा प्रश्नही चाहत्यांना विचारला आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे.तसेच प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “तुमची बाग खूपच सुंदर आहे”, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीही प्रतिक्रिया देत हार्ट इमोजी दिली आहे.

आणखी वाचा – “सदैव हसत राहा आणि…”, राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “माझ्याकडून…”

याआधीही सुरुची व पियुष यांनी लग्नानंतर फिरायला जातानाचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच एकमेकांबरोबर क्वालिटी टाइम घालवतानाही ते नेहमी दिसतात. दरम्यान दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सुरुची नुकतीच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेममध्ये नकारात्मक भूमिकेमध्ये काम करताना दिसून आली होती. मालिकेमध्ये तिच्या भूमिकेचे नाव ‘अस्तिका’ असे होते. तर पियुष हा ‘काव्यांजली-सखी सावली’ या मालिकेमध्ये दिसून आला होता.  

Tags: gardenhomePiyush RanadeSuruchi Adarkarvideo
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
drashti dhami pregnancy

लग्नाच्या नऊ वर्षांनंतर 'मधुबाला' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री गरोदर, व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज, चाहत्यांकडून शुभेच्छा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.