शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जेमिनी असेल घरी तर…”, बायकोने वाढदिवसादिवशी प्रेम व्यक्त करताच सिद्धार्थ चांदेकरने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला, “आनंदाची…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 14, 2024 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mitali Mayekar specially wished to husband Siddharth Chandekar on his birthday.

तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं

‘क्लासमेट्स’, ‘श्रीदेवी प्रसन्न’, ‘ओले आले’, ‘झिम्मा’ अशा गाजलेल्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अत्यंत कमी वयापासून त्याने सिनेविश्वात काम करायला सुरुवात केली. त्याने ‘अग्निहोत्र’ मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. अशातच आज सिद्धार्थचा वाढदिवस आहे आणि सिद्धार्थच्याअ वाढदिवसानिमित्त त्याची बायको मिताली मयेकरने त्याला खास पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

मितालीने सिद्धार्थबरोबरचे हटके फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये मितालीने सिद्धार्थच्या राशीचा उल्लेख करत त्याला असं म्हटलं आहे की, “मी आजवर भेटलेल्या सर्वात Gemini व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक वर्षी तुझ्याबरोबर नवीन साहसाची जंगली सफर असते, जी प्रेम, हास्य आणि अधूनमधून भयानक, मूर्ख विनोदाने भरलेली असते. तू माझा सर्वात चांगला मित्र आणि माझ्या हसण्याचे कारण आहे. मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही”.

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar ???? (@mitalimayekar)

आणखी वाचा – “शेवटी न्याय मिळालाच नाही”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चार महिन्यांनंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली, “या खटल्यामध्ये…”

तसेच यापुढे तिने “हे प्रेम, हास्य, जगभरचा प्रवास आणि अविस्मरणीय क्षणांचे आणखी एक वर्ष आहे. माझ्या प्रिय सिद्धार्थ, तुला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा”. मितालीच्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी लाईक्स वव कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी सिद्धार्थला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. मितालीच्या या पोस्टवर सिद्धार्थने हटके कमेंट करत उत्तर दिले आहे. मितालीच्या या पोस्टवर सिद्धार्थने एका जाहिरातीच्या शीर्षक ओळीचा संदर्भ देत कमेंट केली आहे.

आणखी वाचा – ‘संघर्षयोद्धा’च्या ट्रेलरमध्ये जरांगे पाटील, छगन भुजबळ, सदावर्तेंच्या डायलॉगबाजीची चर्चा, हुबेहुब भूमिका, व्हिडीओ पाहिलात का?

यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “जेमिनी असेल घरी, तर Happiness ची चिंता Don’t Worry”. दरम्यान, सिद्धार्थ-मिताली हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी आहेत. त्यांची सोशल मीडियावरील केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडते, त्यामुळे त्यांनी शेअर केलेल्या प्रत्येक फोटो व  व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसते. अशातच मितालीने सिद्धार्थसाठी लिहिलेली ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधत असून सिद्धार्थने त्यावर केलेली हटके कमेंटही सर्वांना आवडली आहे.   

Tags: marathi entertainment newsmitali mayekarsiddharth chandekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
suruchi adarkar and piyush ranade home garden

सुरुची अडारकर व पियुष रानडे यांनी घरातच तयार केली बाग, व्हिडीओ पाहून कलाकारांकडूनही कौतुक, पाहा व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.