शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला स्वतःला आई होण्याची खूप इच्छा आहे पण…” बेबी प्लॅनिंगबद्दल अंकिता लोखंडेचा खुलासा, म्हणाली, “आलिया भट्टप्रमाणे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 10, 2024 | 5:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ankita lokhande on pregnancy

"मला स्वतःला आई होण्याची खूप इच्छा आहे पण…" बेबी प्लॅनिंगबद्दल अंकिता लोखंडेचा खुलासा, म्हणाली, "आलिया भट्टप्रमाणे…"

टेलिव्हिजनवरील लाडकी अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडेचे नाव घेतले जाते.  ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधून अंकिता घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली. या मालिकेमध्ये तिने ‘अर्चना’ ही व्यक्तीरेखा साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. त्यानंतर ती अनेक कार्यक्रमांमध्येही काम करताना दिसून आली. २०२१ साली ती विकी जैनबरोबर लग्नबंधनात अडकली. दोघेही नुकतेच ‘बिग बॉस १७’ मध्ये दिसून आले होते. यामध्ये दोघांमधील वाद पाहायला मिळाले. त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोट होणार अशा अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या. पण नंतर मात्र अनेक पार्टीमध्ये एकत्र दिसून आल्याने दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचे दिसून आले. (ankita lokhande on pregnancy)

त्यानंतर अंकिता व विकी एका म्युजिक सॉंगमध्ये देखील दिसून आले होते. हा दोघांचाही एकत्रित असा पहिला प्रोजेक्ट होता. त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांची खूप पसंती देखील मिळाली. पण आता अंकिताने आई होण्याबद्दलच्या काही भावना व्यक्त केल्या आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अंकिताला गुडन्यूज कधी देणार असा प्रश्न सतत विचारला जातो. यावर अंकिताने उत्तर दिले की, “मी व विकी आम्ही दोघेही मुलांबद्दल बोलत असतो. ते आमचं भविष्य असणार आहेत. जेव्हा कधीही मला प्रेग्नन्सीबद्दल विचारले जाते तेव्हा माझ्याकडे लपवण्यासारख काहीच नसतं. कधी ना कधी मला मूल होणारच आहे. मला स्वतःला आई होण्याची खूप इच्छा आहे पण आम्हाला मूल कधी होणार याबद्दल तरी मी अजून काही सांगू शकत नाही. पण याबद्दल आमच्यात नेहमी चर्चा होत असते”.

आणखी वाचा – अधिपतींच्या आयुष्यातील सरगमची ढवळाढवळ अक्षराला सहन होईना, समजही दिली अन्…; प्रोमो पाहून उत्सुकता शिगेला

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

पुढे ती म्हणाली की, “मी मूल होण्याआधीच सर्व तयारी करुन ठेवली आहे. त्याच्यासाठी खूप आठवणी देखील ठेवल्या आहेत. आलिया भट्टप्रमाणे मी देखील आता माझ्या मुलांसाठी इमेल लिहिणार आहे. जेणेकरून मला काय सांगायचं आहे हे त्यांना मोठं झाल्यावर पण समजू शकेल”.

आणखी वाचा – “लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?”, ‘त्या’ घटनेवरुन केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट, म्हणाली, “ मत देणार नव्हतेच पण…”

अंकिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच रणदीप हुड्डाबरोबर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली होती.

Tags: alia bhattankita lokhandepregnancyupdate
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Gulabi Sadi fame Sanju Rathod Know about his struggle and journey see the details

बिकट परिस्थितीत गाठला मिलियन व्ह्यूजचा टप्पा, 'गुलाबी साडी'च्या संजू राठोडचा प्रवास आहे इतका खडतर, म्हणाला, "भाडं भरायलाही पैसे नव्हते..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.