‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकत एकामागोमाग एक रंजक वळणे येताना पाहायला मिळणार आहेत. मालिकेत अधिपतीची गायन शिकवणी सुरु झालेली पाहायला मिळत आहे. तर एकीकडे भुवनेश्वरी अधिपतील गाणं शिकवायला एक मॅडमना बोलावतात. भुवनेश्वरीच्या सांगण्यावरुन सरगमला मॅडम अधिपतीला गाणं शिकवायला येतात. त्यावेळी त्या अधिपतीच्या आयुष्यात स्थान मिळवण्यास त्या मॅडमला सांगतात आणि त्यासाठी काही पैसे देखील देतात. भुवनेश्वरीला अक्षराला अधिपतीच्या आयुष्यातून काढून टाकायचं असतं म्हणून ती हा नवा डाव आखते. (Tula Shikvin Changlach Dhada)
तर सरगम मॅडम आल्यापासून अधिपती त्यांचं कौतुक करतात तेव्हा अक्षराचा पारा चढतो. सरगमला पाहिल्यानंतर अक्षराला संशय येतो. अक्षराला सरगम मॅडमची शिकवणी आवडत नाही. अक्षरा सरगमला वेळोवेळी टोकताना पाहायला मिळाली आहे. जेव्हा जेव्हा अधिपती व सरगम मॅडम शिकवण्यासाठी भेटतात तेव्हा अक्षरादेखील तिथे उपस्थित असते. अधिपतीच्या आयुष्यात सरगम आल्यापासून अक्षराला असुरक्षित वाटतं.
अशाच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या प्रोमोमध्ये अक्षरा सरगमला चांगलंचं सुनावताना दिसत आहे. याप्रमाणे अक्षरा अधिपतीला फोन करते आणि बोलते की, तुम्ही जेवलात का हे विचारायला मी तुम्हाला फोन केला आहे. तेव्हा अधिपती म्हणतो की, नाही थांबा मला एक फोन येतोय तो फोन आधी मी घेतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. तेव्हा अक्षरा विचारते, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही आहे का?, तुम्हाला कोणाचा फोन येत आहे. तेव्हा अधिपती सरगमचा फोन असल्याचं सांगतो. त्यानंतर अक्षरा सरगमला फोन लावते आणि विचारते की, बोला काय बोलायचं होतं.
त्यावर सरगम सांगते की, मी अधिपती यांना फोन केला होता. मला तुमच्याशी बोलायचं नव्हतं. त्यावर अक्षरा म्हणते की, हो अधिपती यांनाच फोन केला आहे पण त्यांच्याशी तुम्हाला काय बोलायचं ते मला सांगा. यावर सरगम म्हणते की, त्यांच्याशी मला काय बोलायचं हे मी तुम्हाला का सांगू. यावर अक्षरा म्हणते की, मी त्यांची बायको आहे”, आता अक्षराने चांगलीच सरगम मॅडमची खोड मोडलेली असते. आता मालिकेत पुढे काय होणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.