मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बिकट परिस्थितीत गाठला मिलियन व्ह्यूजचा टप्पा, ‘गुलाबी साडी’च्या संजू राठोडचा प्रवास आहे इतका खडतर, म्हणाला, “भाडं भरायलाही पैसे नव्हते…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 10, 2024 | 6:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gulabi Sadi fame Sanju Rathod Know about his struggle and journey see the details

बिकट परिस्थितीत गाठला मिलियन व्ह्यूजचा टप्पा, 'गुलाबी साडी'च्या संजू राठोडचा प्रवास आहे इतका खडतर, म्हणाला, "भाडं भरायलाही पैसे नव्हते..."

सध्याच्या काही ट्रेंडिंग गाण्यांपैकी चांगलंच गाजत असलेलं गाणं म्हणजे गुलाबी साडी, या गाण्याने अक्षरश; भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आपला प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. ‘गुलाबी साडी’ या गाण्याने अगदी बॉलिवूडपासून ते मराठी मनोरंजन विश्वाला वेड लावले आहे. बॉलिवूडच्या धकधक गर्ल माधुरी दीक्षितपासून ते डान्सर रेमो डिसूझापर्यंत प्रत्येकाने या गाण्यावर ठेका धरला आहे.

एका गाण्यामुळे प्रसिद्धी झोतात आलेला हा संजू राठोड हा नेमका आहे तरी कोण असा प्रश्न त्याचया चाहत्यांना पडला आहे, नुकत्याच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजूने या गण्यामागे त्याचा असलेला संघर्ष व मेहनत तसेच त्याच्या प्रवासाबद्दल सांगितले. संजू हा मुळचा जळगावचा राहणारा असून इंजिनीअरिंगचं शिक्षण घेताना त्याला त्याचया वडील आजोबांजकडून संगीताचं बाळकडू मिळालं असल्याचं त्याने यावेळी म्हटलं आहे. 

View this post on Instagram

A post shared by SANJU RATHOD (@sanjurathod07)

तसेच या मुलाखतीत त्याने असं म्हटलं की, “माझ्या घरातच माझे वडिल व आजोबा भजन करायचे. रात्रीपासून पहाटेपर्यंत ते भजन करायचे आणि त्यांच्याबरोबर मी ते भजन ऐकत बसायचो. तिथूनच माझ्यात ते आलं असावं.” यापुढे त्याने त्याला पहिलं गाणं कसं सुचलं? असा प्रश्न विचारताच संजूने असं म्हटलं की, “माझं पहिलं ब्रेकअप झालं होतं, तेव्हा मला ते गाणं सूचलं. त्याला काही वेगळं कारण नाही. मी तेव्हा दु:खी झालो होतो. मग मी एक रॅप लिहिला. तेव्हा रॅप करता करता मी शोजदेखील केले.”

आणखी वाचा – अमोल कोल्हे यांचा अभिनय क्षेत्रातून ब्रेक, यामागचं नेमकं कारण काय?, स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “मालिका विश्वात…”

यापुढे संजूने त्याच्या साध्यासोप्या गाण्यांबद्दल असं म्हटलं की, “एका कार्यक्रमाला मी रॅप करता करता मी शोज देखील केले. त्या शोला मी माझ्या आईवडिलांना बोलवायचो. तेव्हा एकदा माझे पप्पा आले होते. पप्पांनी तो रॅप ऐकलं. तेव्हा मी त्यांना विचारलं की, “तुम्हाला रॅप आवडला का?.” यावर ते “तू काय लिहिलं आहेस?, हेच कळत नाही आहे”. त्यानंतर मला कळायला लागलं की, आपण असं काहीतरी करावं जे सगळ्यांना आवडेल.”

आणखी वाचा – मनोरंजन क्षेत्रापासून लांब राहूनही ‘ही’ अभिनेत्री कमावते करोडो रुपये, मुंबई ते डेहराडूनपर्यंत आहे एवढी संपत्ती, सध्या करते काय?

यापुढे त्याने त्याच्या पहिल्या गाण्याची आठवण सांगताना असं म्हटलं की, “’माझ्या आईने सांगितलं की, तू देवावर एखादं गाणं कर. मग मी ‘बाप्पावाला गाना’ हे गाणं लिहिलं. तेही लोकांना खूप आवडलं. पण रितेश देशमुख सरांनी त्यावर रील केलं आणि ते गाणं खूपच व्हायरल झालं.” तसेच यापुढे त्याने “मी व्याज घेऊन गाणी करायचो आणि मग व्याजावर व्याज वाढत गेलं आणि खूप कर्ज झालं. माझ्याकडे भाडं भरायलाही पैसे नव्हते. मी युट्युबवरही चुकीचा पत्ता टाकल्याने त्याचे जे पैसे यायचे ते दुसऱ्या ठिकाणी जायचे. माझी दोन वर्ष त्यातच गेली” असं म्हटलं.  

Tags: gulabi sadimarathi entertainment newsmarathi singerSanju Rathod
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
actress laila khan death

सावत्र वडिलांनी केला 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा खून, अखेर १३ वर्षांनी मिळणार न्याय, प्रकरण आलं समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.