टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे ही नेहमी चर्चेत असते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेमध्ये तिने अर्चना ही भूमिका साकारली होती. सालस मुलगी, संस्कारी सून अशी तिची भूमिका घराघरात पोहोचली. यानंतर ती अनेक रिअलिटी शोमध्येदेखील दिसून आली. तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्येदेखील ती दिसून आली. उद्योगपती विकी जैनबरोबर ती लग्नबंधनात अडकली. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. दोघांचा प्रेमळ बॉंडही अनेकदा पाहायला मिळतो. दोघांना नेहमी एकत्रित स्पॉट केले जाते. अशातच आता दोघही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकताच अंकिताने करवा चौथ साजरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांबरोबरदेखील संवाद साधला. (ankita lokhande and vicky jain trolled)
अंकिता व विकी यांनी करवा चौथच्या निमित्ताने पारंपरिक कपडे परिधान केले होते. इमारतीच्या बाहेर उभ्या असलेल्या माध्यमांबरोबर संवाद साधला. यावेळी विकीसाठी उपवास केला असल्याचा खुलासा अंकिताने केला. यावेळी ती निराश असल्याचेदेखील दिसून आले. त्यामुळे याबद्दलची चर्चादेखील सुरु झाली. त्यानंतर विकीनेदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “यामुळेच तर तिचा आवाज येत नाही आहे. स्वतःदेखील उपवास ठेवला आणि मलापण ठेवायला सांगितला आहे”.
दरम्यान आता अंकिताचा लूक नेटकऱ्यांना आवडला नाही. तसेच या व्हिडीओवर प्रतिक्रियादेखील देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “झोपेतून उठून आली आहे असं वाटत आहे”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “कीती ओव्हर ॲक्टिंग करत आहेत”. यावेळी अंकिताने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच नाकातील नथीने अधिक लक्ष वेधून घेतले जात आहे. तसेच विकीने क्रीम रंगाची शेरवाणी परिधान केली आहे.
अंकिताच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती याआधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. रणदीप हुड्डाबरोबर मुख्य भूमिकेत दिसून आली होती. तिच्या भूमिकेला चाहत्यांनी खूप पसंतीदेखील दर्शवली होती. आता ती ‘आम्रपाली’ या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.