मालिकेच्या रुपात चाहते त्यांच्या आवडत्या मालिकांमधील लाडक्या कलाकारांना दररोज भेटत असतात. पण या कलाकारांची प्रत्यक्ष भेट व्हावी अशी इच्छा प्रत्येक चाहत्याच्या मनात असते. आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्षात भेटण्याची व कलाकारांचीही चाहत्यांना भेटण्याची इच्छा असते. काहींची ही इच्छा पूर्ण होते आणि ही भेट झाल्यावर कलाकारांचा आनंद गगनात मावेनासा होतो. असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री गायत्री दातारबरोबर. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेमुळे गायत्री दातारला कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. आजही या मालिकेतील ईशा याच नावाने तिला अनेकजण ओळखतात. अशी ही लोकप्रिय अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते. (Gayatri Datar Fan Video)
अशातच गायत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि हा व्हिडीओ तिच्या एका चाहतीचा आहे. गायत्री शूटिंगवरुन घरी जातं असताना मासे घ्यायला बाजारात गेली असताना तिथल्या मासे विक्रेत्या महिलेने ओळखलं आणि तिचा ही माहिला गायत्रीची चाहती आहे. तसंच या महिलेने ‘तुला पाहते रे’ मालिकेतील लोकप्रिय डायलॉगही म्हणून दाखवला. गायत्रीने या महिलेबरोबरचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. पुढे गायत्रीने या महिलेबरोबर काही खास संवादही साधला. या संवादात त्या महिलेने गायत्रीला त्यांना नातू झाल्याचेही सांगितले. त्यांच्या या गोड संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून गायत्रीच्या चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – Video : सूरज चव्हाणने केदार शिंदेंची घेतली भेट, घरी बोलवत केला विशेष पाहुणचार, दिली ‘ही’ खास भेटवस्तू
या व्हिडीओबरोबरच गायत्रीने असं म्हटलं आहे की, “शूटिंग संपवून परत जाताना कोळंबी घ्यायला थांबले. तिथे या गोड मालनताईंशी ओळख झाली. गायत्री नाही तर ईशा या नावाने त्यांनी मला ओळखलं असा त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी ‘दो रुपये भी बहुत बडी चीज होती है’ हा आवडता संवादसुध्दा म्हणून दाखवला. मग त्यांनी चहा पिण्याचा आग्रह केला. कोळंबी साफ करत त्यांनी गप्पा मारल्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना त्या माझ्याविषयी सांगत होत्या”.
आणखी वाचा – “सगळ्यांचं म्हणणं आहे लग्न कर आणि”…; डोक्याला बाशिंग बांधून जुई गडकरीचा व्हिडीओ व्हायरल, नवरीबाई नटली कारण…
यापुढे गायत्रीने असं म्हटलं आहे की, “मालन ताईंसारखे माझ्यावर, मी साकारलेल्या पात्रांवर प्रेम करणारी माणसे कायम भेटत असतात. आज वाटलं, या निमित्ताने तुम्हा सगळ्यांचे मला इतकं प्रेम दिल्याबद्दल मनापासुन आभार मानावेत. कधी ईशा, कधी शुभ्रा, कधी बिग बॉस, कधी चला हवा येउ द्या… अशा वेगवेगळ्या कामांवर प्रेम करणारी माणसं मला लाभल्यामुळे मी भाग्यवान असल्याची जाणीव सतत जाणवत असते. तुमचं प्रेम असंच कायम माझ्या पाठीशी राहुदे”.