प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहित धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं म्हणजे आई आणि बाबा. आयुष्यभर खस्ता खाऊन आई-वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी रहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. याच विषयावर भाष्य करणारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या मालिकेचे नाव आहे ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’. (Aai Kuthe Kay Karte Will Go Off Air)
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. त्यानंतर नुकतीच आता या मालिकेची वेळ देखील जाहीर करण्यात आली आहे. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका स्टार प्रवाहवर येत्या २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र सध्या या वेळी स्टार प्रवाहवर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पण आता निवेदिता सराफांची मालिका सुरु झाल्यानंतर ‘आई कुठे काय करते’ मालिका संपणार की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेच्या नवीन प्रोमोखाली प्रेक्षकांनी अशा अनेक कमेंट्सही व्यक्त केल्या आहेत. “‘आई कुठे काय करते मालिका संपणार”, “शेवटी ‘आई कुठे…’ पुराण संपणार”, “दुसरी आई कुठे काय करते नसली म्हणजे मिळवलं, त्यागमूर्ती महान देवी वैगरे दाखवू नका म्हणजे झालं”, “रंडुधती ची मालिका संपली” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसंच काहींनी या मालिकेबद्दल उत्सुकताही व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – श्वेता शिंदेंनीही सेलिब्रिट केला करवाचौथ, नवऱ्यासह दिल्या खास पोझ, पारंपरिक लूकमधील फोटो समोर
“अहो आमची आवडती आई कुठे काय करते मालिकेची वेळ ०२.३० आहे ही”, “निवेदिता सराफ यांना त्यांच्या स्वभावानुसारच मालिका मिळतात. त्यांचा स्वभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसुन येतो”, “लग्नाची बेडी, मुरांबा या मालिका बंद करायच्या ना? ही मालिका दुपारी कोण बघनार नाही”, “चांगला विषय असलेल्या मालिका दुपारी न दाखवता संध्याकाळी दाखवा” अशा कमेंट्स केल्या आहेत.
आणखी वाचा – निवेदिता सराफ व मंगेश देसाई यांच्या नवीन मालिकेची वेळ जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दरम्यान, गेल्या सहा वर्षांपासून आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या मालिकेच्या आतापर्यंत अनेकदा वळण मिळालंय. पण तरीही आजही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतं. पण आता सहा वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.