छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये जय भानुशालीचं नाव घेतलं जातं. त्याने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. तसेच अनेक रिॲलिटी शोचे सूत्रसंचालनही केले आहे. त्याच्या अभिनयाने आतापर्यंत सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण कामा व्यतिरक्त तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. त्याने अभिनेत्री माही वीजबरोबर लग्न केले असून त्यांना तारा, खुशी व राजवीर अशी तीन मुलं आहेत.सध्या जयचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये तो एका वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. (jay bhanushali viral video)
जय आपल्या मुलांवर खूप प्रेम करतो. अनेकदा त्याची मुलगी ताराबरोबर तोही लहान बनून जातो. पण आता त्याने ताराची इच्छा पूर्ण करण्यासाठी असे काही केले आहे ज्यामुळे त्याला खूप अवघड वाटले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जयने आपल्या पत्नीचा गाऊन घातला असून मुलीने हा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
आणखी वाचा – हिंदीनंतर मराठीमध्येही प्रदर्शित झाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट, रणदीप हुड्डाच्या भूमिकेला सुबोध भावेचा आवाज, म्हणाला, “अशी संधी…”
जेव्हा जय गाऊन घालून बाहेर येतो तेव्हा तारा वर इतर मुलं खूप हसतात. जयला अशा रूपात बघून तारा खूप खुश होते. पण नंतर मात्र जयला खूप लाज वाटते आणि तो खोलीमध्ये जाऊन कपडे बदलून येतो.
त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “पाजी, तुम्ही ग्रेट आहात”, अजून एका नेटकऱ्याने लिहिले आहे की , “यावरुन हे सिद्ध होते की वडील आपल्या मुलीसाठी काहीही करु शकतात”. त्याच्या या व्हिडीओला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. मुलीचे सर्व लाड जय पूर्ण करत असल्याने सगळेजण त्याचे कौतुक करत आहेत.
जयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो गेल्या वर्षी ‘हम रहे ना रहे हम’ या शोमध्ये दिसून आला होता. याव्यतिरिक्त त्याने ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन ३’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. सध्या मात्र तो आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.