शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या दोन वर्षांनंतर सुप्रसिद्ध अभिनेता घेणार घटस्फोट, सतत होणाऱ्या वादामुळे संसारच न करण्याचा निर्णय, म्हणाला, “आमच्यात मतभेद…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 27, 2024 | 5:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor Abhishek Malik Divorce

लग्नाच्या दोन वर्षांनंतर सुप्रसिद्ध अभिनेता घेणार घटस्फोट, सतत होणाऱ्या वादामुळे संसारच न करण्याचा निर्णय, म्हणाला, "आमच्यात मतभेद..."

सध्या सिनेसृष्टीतून बऱ्याच वाईट बातम्या कानावर येत आहेत. अशातच आता एका प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतील अभिनेता अभिषेक मलिक व त्याची पत्नी सुहानी चौधरी यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अनेक दिवसांपासून समोर येत होत्या. सदर वृत्ताला दोघांनीही दुजोरा दिला असून आम्ही एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. या बातमीने अभिषेक व सुहानीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. (Actor Abhishek Malik Divorce)

नऊ महिने एकमेकांना डेट केल्यानंतर अभिषेक व सुहानी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर २०२१ मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. घटस्फोटाच्या चर्चेवर अभिषेक म्हणाला की, “आमच्या मनात कोणतीही चुकीची भावना नाही. आम्ही यापुढेही एकमेकांशी चांगले राहू”. तर सुहानी म्हणाली की, “आमच्यामध्ये काही मतभेद आहेत पण हे आम्ही जेव्हा एकत्र राहायला लागलो तेव्हा आम्हाला समजले. सध्या आम्हाला एकमेकांबद्दल कोणतीही तक्रार नाही. आम्ही दोघांनीही आपापल्या आयुष्यात पुढे जावे असे आम्हाला वाटत आहे. वेगळे होण्याचा निर्णय घेणे आमच्यासाठी कदाचित योग्य आहे. मी अभिषेकच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते”, असे तिने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा – “बाळाला जन्म दे कारण…”, सलमान खानने अंकिता लोखंडेला दिला सल्ला, अभिनेत्री म्हणाली, “त्यांचे बोलणं ऐकून मी अस्वस्थ झाले आणि…”

View this post on Instagram

A post shared by Abhishek Malik (@abhishek__malik)

अभिषेकला जेव्हा त्याच्या नात्याबद्दल सुरुवातीला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला होता की, “जेव्हा मी सुहानीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा आम्ही आमचे फोन नंबर एकमेकांना दिले. पण त्यावेळी याचा काय फायदा असेही वाटले होते. कारण मी मुंबईमध्ये होतो तर सुहानी दिल्लीमध्ये होती. पण २०२०ला कोरोना दरम्यान लॉकडाऊन झाल्याने मी दिल्लीला परतलो. त्यावेळी आम्ही आमचं नातं पुढं नेण्याचा विचार केला. पडद्यावर अनेकदा लग्न केली आहेत पण खऱ्या आयुष्यात आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर लग्न करणं आणि त्याच व्यक्तीबरोबर घरी जाणं हे खूपच आनंद देणार आहे”, अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

आणखी वाचा – Video : पूजा सावंतचा हळदीत ‘बुमरो’वर भन्नाट डान्स, बहिणीला घेऊनही मराठी गाण्यावर बेभान होऊन नाचली अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

अभिषेकने आपल्या करिअरची सुरुवात २०१२ साली ‘छल-शह और मात’ या मालिकेमधून केली होती. त्यानंतर तो ‘दिल की नजर से खूबसूरत’, पुनर्विवाह- एक नई उम्मीद’, ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकांमधून त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

Tags: Actor Abhishek malikdivorcekumkum bhagyasuhani Chaudharytv serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेला दत्तगुरुंचं वेड, गाणगापूरला मंदिराबाहेर गायनसेवा अन्…; फोटो शेअर करत दाखवली संपूर्ण झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.