बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पूजा सावंतचा हळदीत ‘बुमरो’वर भन्नाट डान्स, बहिणीला घेऊनही मराठी गाण्यावर बेभान होऊन नाचली अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 27, 2024 | 4:39 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Pooja Sawant Siddhesh Chavan Haladi Ceremony

Video : पूजा सावंतचा हळदीत 'बुमरो'वर भन्नाट डान्स, बहिणीला घेऊनही मराठी गाण्यावर बेभान होऊन नाचली अन्...; व्हिडीओ तुफान व्हायरल

सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असून एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अभिनेता प्रथमेश परब क्षितीजा घोसाळकरसह लग्नबंधनात अडकला. तर अभिनेत्री तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचाही शाही विवाहसोहळा संपन्न झाला. यापाठोपाठ आता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंतही लग्नबंधनात अडकणार आहे. पूजा सावंतच्या घरीही लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळत आहे. पूजाच्या लग्नापुर्वीच्या विधींचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. (Pooja Sawant Siddhesh Chavan Haladi Ceremony)

अशातच पूजाचा अगदी थाटामाटात हळदी समारंभ पार पडला. पूजाच्या हळदीला साऱ्यांनी धमाल, मस्ती केलेली पाहायला मिळाली. हळद लावताना पूजाला अश्रूही अनावर झालेले पाहायला मिळाले. मॉडर्न पेहरावात जरी हा हळदी समारंभ पार पडला असला तरी या कार्यक्रमाला पारंपरिक टच मिळाला. हळदी समारंभात गायली जाणारी गाणी पूजाच्या हळदीला ऐकायला मिळाली. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व मित्र परिवाराच्या उपस्थितीत पूजाचा हळदी समारंभ संपन्न झाला.

आणखी वाचा – Video : प्रेम असावं तर असं! करवली म्हणून मिरवताना कोसळलं रडू, बहिणीला बघून पूजा सावंतचेही अश्रू थांबेनात, भावुक व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

पूजाच्या हळदी समारंभातील डान्सचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. पूजाला लहानपणापासून नृत्याची आवड आहे. पूजाने स्वतःच्या हळदीमध्ये ‘बुमरो बुमरो’ या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. पूजा या गाण्यावर डान्स करत असताना तिचा मित्र-परिवार अवतीभवती गोल करुन बसत तिला साथ देताना दिसला. तर पूजाच्या हळदीतील आणखी एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओत पूजा तिची लाडकी बहीण रुचिरासह ठेका धरताना दिसत आहे.

आणखी वाचा – वेस्टर्न स्टाइल लेहेंगा अन् हिरव्या बांगडया; पूजा सावंतचा हळदी समारंभासाठी हटके लूक, नवऱ्याबरोबर रोमँटिक पोज देतानाचा व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

दोघी बहिणीचं एकमेकींवर भरपूर प्रेम आहे. पूजाला हळद लावतानाही तिच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. पूजा व सिद्देशचा हळदी समारंभातील लूकही चर्चेत आला आहे. हळदी समारंभासाठी दोघांनी पिवळा रंग न निवडता जांभळ्या रंगाच्या पेहरावाची निवड केली होती. पूजाने यावेळी लेहेंगा-चोळी परिधान केली होती तर सिद्धेश जांभळ्या रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये पाहायला मिळाला. तर पूजाच्या हातातील हिरवा चुडा आणि केसात माळलेल्या पांढऱ्या रंगाच्या गजऱ्याने तिचं सौंदर्य आणखीनच फुलून आलं होतं.

Tags: entertainmentpooja sawantpooja sawant dancePooja Sawant Siddhesh ChavanPooja Sawant Siddhesh Chavan Haladi Ceremony
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Salman Khan gives advised ankita lokhande to make their marriage stronger with Vicky jain

"बाळाला जन्म दे कारण...", सलमान खानने अंकिता लोखंडेला दिला सल्ला, अभिनेत्री म्हणाली, "त्यांचे बोलणं ऐकून मी अस्वस्थ झाले आणि..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.