रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाळाला जन्म दे कारण…”, सलमान खानने अंकिता लोखंडेला दिला सल्ला, अभिनेत्री म्हणाली, “त्यांचे बोलणं ऐकून मी अस्वस्थ झाले आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 27, 2024 | 4:59 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Salman Khan gives advised ankita lokhande to make their marriage stronger with Vicky jain

"बाळाला जन्म दे कारण...", सलमान खानने अंकिता लोखंडेला दिला सल्ला, अभिनेत्री म्हणाली, "त्यांचे बोलणं ऐकून मी अस्वस्थ झाले आणि..."

‘बिग बॉस १७’ हा शो आता संपला असला तरीदेखील या शोविषयी व शोमधील कलाकारांविषयी अजूनही चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस १७’च्या घरातील अनेक लोकप्रिय जोड्यांपैकी एक कलाकार जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. बिग बॉसच्या घरात अंकीटा विकी यांच्यात अनेकदा वाद, भांडणं व मारामारी झाल्याचे पाहायला मिळाले.

‘बिग बॉस’च्या घरातील अंकिता व विकी यांच्या भांडणामुळे या घराबाहेर पडताच त्यांचे नाते टिकेल की नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. अंकिता-विकी यांच्या भांडणामुळे त्यांचे नाते अनेकदा तुटण्याच्या मार्गावर आले होते. अशातच अंकिताने सलमान खाननेही तिला लग्न वाचवण्यासाठी एक खास सल्ला दिला असल्याचा खुलासा केला आहे. अंकिताने नुकतीच भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांना खास मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने याबद्दलचा खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

आणखी वाचा – “प्रेम आमचं खरं आहे नाही थिल्लर टाईमपास…”, नवऱ्याच्या चित्रपटांची नावं घेत प्रथमेश परबच्या बायकोचा खास उखाणा, म्हणाली, “आयुष्यभर एकमेकांना…”

यावेळी ती असं म्हणाली की, “सलमान सरांनी मला बिग बॉस संपताच त्यांना भेटायला गेली असताना एक सल्ला दिला होता. तेव्हा ते मला असं म्हणाले होते की, मी तुम्हाला एक सांगतो की आता तुम्ही बाळाला जन्म द्या. यावर मी त्यांना “सर, काय म्हणत आहात?” असं म्हटलं. सलमानचे हे बोलणे ऐकून मी थोडी अस्वस्थ झाली होती. यापुढे अंकिता असं म्हणाली, “त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की मूल झाल्यानंतर एखादे जोडपे आणखी जवळ येतात”.

आणखी वाचा – Video : पंकज उधास यांना शेवटचं पाहताना पत्नीची वाईट अवस्था, मुलींनी धरुन आणलं अन्…; कुटुंबियांची परिस्थिती पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर

या मुलाखतीत विकी जैननेही सहभाग घेतला होता. यावेळी तो असं म्हणाला की, “कोणतेही लग्न केवळ मुलांमुळेच दीर्घकाळ टिकते.” दरम्यान, अंकिता-विकी यांना ‘बिग बॉस’ शोमुळे चांगलीच लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली आहे. या शोमुळे त्यांना आता आणखी नवीन शोदेखील मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे अनेक चाहतेमंडळी उत्सुक आहेत.

Tags: सलमान खानअंकिता लोखंडेमनोरंजन बातमीबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीविकी जैनankita lokhandebollywood actorbollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newssalman khanvicky jain
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Actor Abhishek Malik Divorce

लग्नाच्या दोन वर्षांनंतर सुप्रसिद्ध अभिनेता घेणार घटस्फोट, सतत होणाऱ्या वादामुळे संसारच न करण्याचा निर्णय, म्हणाला, "आमच्यात मतभेद…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.