बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकांची भरभरुन पसंती, व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 30, 2023 | 1:46 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
premachi goshta tittle song released

premachi goshta tittle song released

सध्या मालिकाविश्वात बऱ्याच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. तर काही नवीन मालिका नव्या कथानकांसह येत आहेत. अशीच एक नवी मालिका ‘स्टार प्रवाह’वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून त्याच्या जागी ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका येत आहे. या मालिकेतून पुन्हा एकदा तेजश्री प्रधान नव्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तिच्यासह मालिकेत अभिनेता राज हंचनाळे, अभिनेत्री शुभांगी गोखले, अभिनेत्री  अपूर्वा नेमळेकर असे कलाकार पाहायला मिळतील. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला. प्रोमो पाठोपाठ मालिकेचं शीर्षकगीतही प्रदर्शित करण्यात आलं आहे.(premachi goshta tittle song released)

‘तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट’ अशा शब्दांनी सजलेल्या या शीर्षकगीताचं सगळीकडूनच कौतूक होत आहे. नुकताच ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या शीर्षकगीताचा व्हिडीओ शेअर केला गेला. या शीर्षकगीतचे गीतकार श्रीपाद जोशी तर निलेश मोहरीर यांनी हे शीर्षकगीत संगीतबद्ध केलं आहे. गायक अभिषेक तेलंग व गायिका सुगंधा दाते यांनी हे शीर्षकगीत गायलं आहे. या दोघांचंही ‘सारेगमप’शी एक विशेष नातं आहे.

वाचा – कस वाटलं चाहत्यांना हे शीर्षकगीत?

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा- शाही थाट, पारंपरिक लूक अन्…; अक्षय देवधरची पहिली मंगळागौर थाटामाटात पार, फोटो व्हायरल

गायक अभिषेक तेलंग हा ‘सारेगमप मराठी’चा फायनलिस्ट होता. तर गायिका सुगंधा दाते ही ‘सारेगमप हिंदी लिटिल चँप्स २०१९’ या पर्वाची विजेती होती. त्यामुळे या गाण्याला ‘सारेगमप’च्या माहेरघराचं स्वरूप प्राप्त झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा भाजपामध्ये प्रवेश, म्हणाला, “किती काळ काठावर उभं राहून…”

लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शीर्षकगीताला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट करत या गाण्याचं कौतूक केलं आहे. स्टार प्लसवरील ‘ये है मोहोब्बते’ या हिंदी मालिकेचा ही मालिका रिमेक असल्यामुळे चाहतावर्ग या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. एका नेटकऱ्याने ‘अप्रतिम शब्दरचना आणि मधुर आवाज यार’ म्हणतं म्हटलं आहे. ही मालिका ४ सप्टेंबरपासून संध्याकाळी ८ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.  

Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Allu Arjun Viral Video

Video : अल्लू अर्जुनचं कोट्यवधी रुपयांचं घर तुम्ही पाहिलंत का? अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.