कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्राकडेही काही कलाकार मंडळींचा कल पाहायला मिळतो. अमोल कोल्हे, प्रिया बेर्डे, आदेश बांदेकर, सौरभ गोखले यांसारख्या मराठी कलाकारांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता आणखी एका कलाकाराने राजकीय पक्षात प्रवेश केला असल्याचं घोषित केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अभिजीत केळकरने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यादम्यानचे फोटोही त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
अभिजीतने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रिया बेर्डे दिसत आहेत. प्रिया यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही कलाकारांनी या पक्षात प्रवेश करण्याचं ठरवलं. आता अभिजीतने राजकीय क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं आहे. त्याने पक्ष प्रवेशादरम्यानचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तसेच राजकीय क्षेत्रातही काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
आणखी वाचा – “जगाचे नियम मोडून…”, शिवानी सुर्वेसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, म्हणाला, “आपल्या वागण्यावर…”
अभिजीत म्हणाला, “भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश. जसं ते म्हणतात की, तुम्हाला बदल करण्यासाठी त्या प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे. किती काळ काठावर उभं राहून नावं ठेवायची. त्या प्रवाहात सामिल होऊन, समजून घेऊन, काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करुया”. अभिजीतने फोटो शेअर करताच अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी त्याला ट्रोल केलं आहे.
आणखी वाचा – रवींद्र महाजनींच्या मृत्यूमागचं खरं कारण काय?, गश्मीर महाजनीने सांगितलं सत्य, म्हणाला, “त्यांचा मृत्यू…”
तू हे काय केलं? तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, तू भाजपामध्ये प्रवेश करायला नको हवं होतं अशा काहींनी कमेंट केल्या आहेत. तर काहींनी अभिजीतचं मन भरुन अभिनंदन केलं आहे. अभिजीतने आजवर मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘बिग बॉस मराठी’मधल्या नावाजलेल्या चेहऱ्यांमध्ये अभिजीतचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आता राजकीय क्षेत्रात अभिजीत काय कमाल करतो हे पाहावं लागेल.