साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचे जगभरात चाहते आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटामुळे तो सध्या चर्चेत असून काही दिवसांपूर्वी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्याच्या ‘पुष्पा १’ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर लवकरच त्याचा दुसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यानिमित्त अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या घराची व ‘पुष्पा २’ या आगामी चित्रपटाच्या सेटची भेट घडवून आणत आहे. (Allu Arjun Viral Video)
अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या घराची एक झलक त्याच्या चाहत्यांना दाखवत आहे. पुढे तो रामोजी फिल्म सिटीत असलेल्या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या सेटची सफर घडवून आणतो. या व्हिडिओमध्ये अल्लूचा लुक समोर आला असून त्याचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
आणखी वाचा – धमाल-मस्ती, गप्पा अन्…; लेक व जावयासह शुभांगी गोखले सोनाली कुलकर्णीच्या घरी, आलिशान घराने वेधलं लक्ष
या व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये अल्लू अर्जुन म्हणतो, “भारतातील चाहते इतर जगापेक्षा वेगळे आहेत. ते मी स्पष्ट करणार नसून ते तुम्हाला पाहावे लागेल.” तसेच तो हेही म्हणतो की, “ही भूमिका करण्याच्या प्रेरणेमागे चाहत्यांचा मोठा वाटा असून मला त्यांचा खरोखर अभिमान वाटतो.” अल्लू अर्जुन गेल्या २० वर्षांपासून चित्रपटात काम करत असला, तरी त्याच्यासाठी हा चित्रपट महत्वाचा असून अभिनेत्याला चित्रपटातील त्याचे कधीही न सोडणारे पात्र आवडले असल्याचे तो या व्हिडिओत म्हणतो.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा भाजपामध्ये प्रवेश, म्हणाला, “किती काळ काठावर उभं राहून…”
अल्लू अर्जुनचा हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्समधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता अल्लू अर्जुन लवकरच ‘पुष्पा : द राईझ’चा सिक्वेल ‘पुष्पा २ : द रूल’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. सध्या या चित्रपटाचे शूट सुरु असून या चित्रपटात प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Allu Arjun Viral Video)