बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता व अभिनेता इमरान हाशमी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बरीच आवडली. त्यांनी आजवर तीन चित्रपट एकत्र केले. त्यातील त्यांचा ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातील किसिंग सीन चांगलाच गाजला. बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वात लोकप्रिय सीनपैकी एक म्हणून त्याच्याकडे आजही पाहिलं जातं. तनुश्रीने अलीकडेच त्या किसिंग सीनबद्दल वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर तिने इमरानबरोबरची तिची ऑफस्क्रिन केमिस्ट्री कशी होती याबाबतही तिने खुलासा केला. (Tanushree dutta speaks about kissing scenes)
तनुश्री व इमरानचा किसिंग सीन बराच गाजला होता. या सीनबाबत ‘फिल्मज्ञान’ला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनत्रीने याबाबत सांगितलं. तनुश्री म्हणाली, “माझ्यासाठी पहिल्या दिवसापासून इमरान एक अभिनेताच होता. मी त्याच्याबरोबर आजवर तीन चित्रपट केले. ‘चॉकलेट’ चित्रपटामध्येही आम्ही पहिला किसिंग सीन केला होता. पण चित्रपटात तो सीन ठेवला गेला नाही. ही वेळ पहिल्यांदाच असल्यामुळे मला ते थोडं अवघडल्यासारखं वाटलं होतं. पण दुसऱ्यांदा मात्र थोडा अवघडपणा कमी झाला होता. कारण आमच्यात वैयक्तिकरित्या वास्तविक जीवनात कोणतीही केमिस्ट्री नव्हती. किसिंग सीनमध्ये त्याचा हातखंड आहे असं सगळ्यांना वाटतं पण तसे सीन तो सहजरित्या करु नाही आणि मीही करु शकत नाही”.
तनुश्री व इमरान यांनी ‘आशिक बनाया आपने’, ‘चॉकलेट:डीप डार्क सिक्रेट्स’, आणि ‘गुड बॉय, बॅड बॉय’ या तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. तनुश्री दत्ताने २००५ मध्ये ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘रकीब: रिव्हल्स इन लव्ह’, ‘ढोल’, ‘सास बहू और सेन्सेक्स’ सारख्या बऱ्याच तित्रपटांमध्ये काम केलं. ‘हम ने ली है शपथ’ हा चित्रपट तिचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर तिने अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
इमरानला त्याच्या या सीनमुळे ‘सिरियल किसर’ असा टॅग मिळाला आहे. त्याला ‘मर्डर’, ‘जेहर’, ‘गँगस्टर’ यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांमुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. पण त्यानंतर त्याने ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘शांघाय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याच्या हटके विविध भूमिकांमुळे त्याने सगळ्यांना चकित केलं. सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटातही तो दिसला होता.