सध्या सर्वत्र लग्नसराईचा माहोल सुरू आहे. गेले काही दिवस मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधली. बिग बॉस’ या शोमध्ये असताना या कलाकारांची एकमेकांबरोबर मैत्री झाली आणि त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर गेल्या महिन्यात १८ नोव्हेंबर रोजी अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख यांनी एकमेकांशी शाही पद्धतीने विवाह केला. यानंतर नुकताच अभिनेता पियुष रानडे व अभिनेत्री सुरुची अडारकार ही जोडीदेखील विवाहबंधनात अडकली. यांच्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या बतम्यांवर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
अभिनेत्री मानसी मोघे हिने एका हिंदी अभिनेत्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे. मानसीने गुपचूप लग्नगाठ बांधत तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. हे फोटो पाहून तिचे चाहतेही भलतेच खुश झाले आहेत. दरम्यान, तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे तर सूर्यानेही तिच्या साडीच्या रंगाला साजेशा असा पोशाख परिधान केल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर या फोटोंतील त्यांच्या निखळ हास्याने त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा – “महाराष्ट्र अजून चिखलात जात आहे आणि…”, सुबोध भावेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “प्रभू श्रीराम असल्यासारखं…”
मानसीने हिंदी अभिनेता सूर्या शर्माबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नासाठी त्यांचे काही खास मित्रमंडळी व जवळच्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सूर्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत त्याखाली “कायमची माझी” असं म्हटलं आहे. त्यांच्या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलीच पासणी दाखवली आहे. त्याचबरोबर अनेक कलाकरांनी व नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
आणखी वाचा – अमृता फडणवीसांचं नवं गाणं ‘तुम्हे आईने की जरुरत नहीं’ प्रदर्शित, आवाज ऐकून नेटकरी म्हणाले, “कर्कश आवाज आणि…”
दरम्यान, मानसीने २०१५ साली आलेल्या ‘बुगडी माझी सांडली गं’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर ती अंकुश चौधरीच्या ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटात झळकली होती. तिने ‘ख्याबो के परिंदे’ या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. तर तिचा नवरा हादेखील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘अनदेखी’, ‘ये काली काली आँखे’, ‘होस्टेजेस’, ‘ब्राउन’ अशा वेबसीरीजमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.