सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता का उलट चश्मा’ फेम भिडे मास्तर थेट पोहोचले सांगलीत; पाच रुपयांची लेमन गोळी, डोक्यावर गांधी टोपी अन्…; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “आमच्या जमान्यातील…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 6, 2026 | 5:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
TMKOC Fame Mandar Chandwadkar Post

'तारक मेहता का उलट चश्मा' फेम भिडे मास्तर थेट पोहोचले सांगलीत

TMKOC Fame Mandar Chandwadkar Post : टेलिव्हिजनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि दीर्घकाळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक मलिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. २००८ साली सुरू झालेल्या या मालिकेने आजवर विविध वयोगटांतील प्रेक्षकांना खळखळून हसवलं असून, गोकुळधाम सोसायटीमधील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटी ही विविधतेचं प्रतिक मानल जातं. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील कुटुंबं एकत्र राहत असल्यामुळे सण-उत्सव असो वा एखादं संकट, सगळे एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. प्रत्येक पात्राच्या खास स्वभावामुळे ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.

मालिकेत आत्माराम भिडे उर्फ भिडे मास्तर ही भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांचा चाहतावर्गही मोठा आहे. मालिकेतील शिस्तप्रिय भिडे मास्तर जसे प्रेक्षकांना भावतात, तसेच मंदार चांदवडकर सोशल मीडियावरही आपल्या साध्या आणि दिलखुलास पोस्टमधून लक्ष वेधून घेत असतात. नुकताच मंदार चांदवडकर यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला असून, तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते सांगली जिल्ह्यातील बहेगाव परिसरात रस्त्यावरील एका विक्रेत्याजवळ थांबलेले दिसतात. या विक्रेत्याकडे चणे, फुटाणे, लेमन गोळी यांसारखे पारंपरिक खाण्याचे पदार्थ असल्याचं पाहायला मिळतं.

आणखी वाचा – ‘कमळी’च्या रेट्रो पार्टीमध्ये कमळी-ऋषीचा जबदस्त डान्स; रेट्रो लूकने वेधलं लक्ष, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Mandar Chandwadkar (@realmandarchandwadkar)

व्हिडीओमध्ये मंदार चांदवडकर विक्रेत्याला पदार्थांची किंमत विचारतात, तेव्हा विक्रेता हे सगळं फक्त पाच रुपयांत मिळत असल्याचं सांगतो. यावर प्रतिक्रिया देताना मंदार म्हणतात, “आपण २०२६ मध्ये आलो आहोत आणि आजही पाच रुपयांत गोष्टी मिळतात.” यानंतर ते कॅमेऱ्याकडे पाहत, “हे सगळं पाहून तुम्हाला काही आठवलं का?” असा मजेशीर प्रश्न विचारतात. इतकंच नाही तर ते त्या विक्रेत्याकडून गांधी टोपी मागून डोक्यावर घालतात आणि पाच रुपयांची लेमन गोळी घेत म्हणतात, “ही आमच्या जमान्यातली लेमन गोळी आहे, याची मजाच वेगळी आहे.” या क्षणांमधून त्यांचा साधेपणा आणि आठवणींशी असलेली नाळ स्पष्टपणे दिसून येते.

आणखी वाचा – ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्रीचं ठरलं! लवकरच अडकणार लग्नबंधनात, सुपारी फुटली अन्…

हा व्हिडीओ शेअर करताना मंदार चांदवडकर यांनी “आमच्या जमान्याची आठवण आली” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, अनेकांनी कमेंट्समधून जुन्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या आहेत. याशिवाय चाहत्यांनी देखील अभिनेता मंदार चांदवडकर यांच्या या पोस्टवर भरभरून लाईक आणि कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Tags: bollywood newsentertainmentTMKOC Fame Mandar Chandwadkar Post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
Kajal Kate Reaction On Participating Bigg Boss Marathi 6

"मी 'बिग बॉस' मराठीमध्ये…"; 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्री 'बिग बॉस मध्ये जाण्याबद्दल स्पष्टच बोलली, म्हणाली, "'बिग बॉसच्या' घरात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.