Gayatri Datar Will Get Married Soon: मराठी सिनेसृष्टीत सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळाली. काहींनी लग्नाची सुखद बातमी दिली तर काहींनी साखरपुडा समारंभ उरकला. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री गायत्री दातारने थेट साखरपुड्याचे फोटो शेअर एंगेज असल्याचं घोषित केलं. गायत्रीने फक्त साखरपुड्याची अंगठी दाखवत साखरपुडा झाल्याचं सांगितलं. दरम्यान आता अभिनेत्रीच्या लग्नाची सुपारी फुटली असून याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आता गायत्री आणि श्रीकांत यांच्या लग्नाची सुपारी देखील फुटली आहे. दोघांच्याही कुटुंबियांच्या उपस्थितीत हा सुपारी फोडण्याचा सोहळा पार पडला. या छोट्याखानी सोहळ्याचा व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यामुळं येत्या काही महिन्यांत दोघांचाही लग्न सोहळा पार पडणार आहे. तर हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने ‘सुपारी फुटली’ असं कॅप्शन दिलं आहे. तर आता गायत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली असून लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Gayatri Datar Will Get Married Soon)
गायत्रीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या आयुष्यात ‘हिरोची एन्ट्री’ झाल्याचं सांगितलं होतं. सुरुवातीला तिनं आपल्या जोडीदाराचा चेहरा गुलदस्त्यात ठेवला होता, मात्र ख्रिसमसच्या दिवशी एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांची उत्सुकता संपवली. गायत्रीच्या होणाऱ्या पतीचे नाव श्रीकांत चव्हरे असे आहे. श्रीकांत हा ग्लॅमर विश्वातील नसला तरी तो उच्चशिक्षित आहे. श्रीकांतने देशातील नामांकित अशा IIT बॉम्बे मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.इतकंच नाही तर तो एक कुशल फोटोग्राफर असून त्याला ड्रोन फोटोग्राफीची विशेष आवड आहे. तर श्रीकांतला प्रवासाची प्रचंड आवड असून त्याने जगातील अनेक देशांत भ्रमंती केली आहे. (Gayatri Datar Will Get Married Soon)
आणखी वाचा: “आत्महत्येची भीती दाखवतो…”; शशांक केतकरचे मंदार देवस्थळीवर आरोप, व्हिडीओ शेअर केला अन्…




