बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मध्ये सचिन पिळगांवकर नव्हे तर ‘हा’ अभिनेता साकारणार सुभाषचंद्र बोस यांची भूमिका, पोस्टरमधून सत्य आलं समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 21, 2024 | 12:47 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Swatantra Veer Savarkar Movie

'स्वातंत्र्यवीर सावरकर'मध्ये सचिन पिळगांवकर नव्हे तर 'हा' अभिनेता साकारणार सुभाषचंद्र बोस यांची भूमिका, पोस्टरमधून सत्य आलं समोर

वीर सावरकर यांच्यावर आधारित रणदीप हुडा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट येत्या २२ मार्च रोजी सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात वीर सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुड्डा याला पाहायला मिळणार आहे. तर वीर सावरकर यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री अंकिता लोखंडे साकारणार आहे. (Swatantra Veer Savarkar Movie)

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा अगदी दिमाखात करण्यात आला होता. त्यांनतर या चित्रपटाचा मराठी ट्रेलर देखील लॉंच करण्यात आला. सुबोध भावे याने चित्रपटात मराठी भाषेत सावरकरांचा आवाज दिला आहे. ट्रेलर आल्यापासून महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांची भूमिका कोण साकारणार? हा प्रश्न सर्वांना पडला होता. अशातच ‘झी स्टुडिओ’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांचे पोस्टर समोर आले असून ही भूमिका कोण साकारणार हे समोर आलं आहे.

आणखी वाचा – “मी माफी मागणार नाही…”, मंदिर-मशिदीत जाण्यावरुन सारा अली खान ट्रोल, अखेर अभिनेत्रीने हिंदू-मुस्लिमांबाबत केलं मोठं भाष्य

View this post on Instagram

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

या पोस्टरवरुन सुभाषचंद्र बोस यांची भूमिका ब्रजेश झा साकारणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून सुभाषचंद्र बोस यांची भूमिका सचिन पिळगांवकर साकारणार असल्याची चर्चा होती. पण सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत अभिनेता ब्रजेश झा पाहायला मिळणार आहे. अखेर पोस्टर समोर आल्यामुळे ब्रजेश झा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात पाहायला मिळणार, हे निश्चित झालं आहे. तर महात्मा गांधी यांच्या भूमिकेत राजेश खेरा पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – रामलल्लाचं दर्शन घ्यायला गेली प्रियांका चोप्रा, लेक आयोध्या म्हणून ओरडू लागली अन् नवऱ्याच्या कपाळी टिळा, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात सुभाषचंद्र बोस यांची भूमिका ब्रजेश झा साकारणार आहेत. आजवर ब्रजेश याने आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तर राजेश खेरा याने देखील त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत ब्रजेश यांना तर महात्मा गांधी यांच्या भूमिकेत राजेश यांना पाहायला प्रेक्षक उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे

Tags: entertainmentsachin pilgaonkarSachin Pilgaonkar in Swatantra Veer Savarkar Moviesachin pilgaonkar movieswatantra veer savarkar movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
Next Post
Govinda married with sunita

६०व्या वर्षी गोविंदाने पत्नीसह पुन्हा बांधली लग्नगाठ, बायकोनी 'ती' तक्रार केल्यानंतर अभिनेत्याने काय केलं पाहा, म्हणाली, "आमच्या लग्नाचा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.