sanchita ugale passed away : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन झाले आहे. तिचा मृतदेह मुंबईतील नालासोपारा येथील त्यांच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. रविवारी सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता नालासोपारा पूर्वेकडील आचोळे गावात आई-वडील आणि १५ वर्षीय बहिणीसोबत राहत होती. रविवारी संध्याकाळी घरी एकटी असताना तिने पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी त्याला तातडीने महानगर पालिकेच्या तुलिंज रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुटुंबीयांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत्यूच्या कारणाचा तपास सुरु केला. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. सध्या घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.
आणखी वाचा – भारतीय वाघिणींचा विजय! पाकिस्तानचा ६४ धावांनी उडवला धुव्वा, वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय
संचिता उगले यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात तिने सुकुनची भूमिका साकारली होती. ‘छावा’ चित्रपटातही तिने ताराबाईची भूमिका साकारली होती. याशिवाय ती ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘वागळे की दुनिया’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही दिसली होती.




