‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटामुळे बॉलिवूड स्टारकिड सारा अली खान चर्चेत आली आहे. सारा अली खान ही तिचं नेहमीच स्पष्टपणे मत मांडताना दिसते. सोशल मीडियावरही सारा खूप सक्रिय आहे. अनेकदा अभिनेत्रीला तिच्या आडनावामुळे, मंदिरे आणि मशिदींना भेट दिल्याने ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. या ट्रोलिंगवर अभिनेत्रीने अलीकडेच मौन सोडले आहे. साराच्या समोर आलेल्या या भाष्यानंतर कदाचित आता लोक हिंदू आणि मुस्लिम असा भेद करणार नाहीत. (Sara Ali Khan On Trolling)
सारा अली खान एका धर्मनिरपेक्ष कुटुंबात वाढली. तिचे वडील सैफ अली खान हे मुस्लिम कुटुंबातील आहेत. तर आई अमृता सिंग हिंदू आहे. अलीकडेच तिने खुलासा केला आहे की, पूर्वी ती स्वत:ला जगासमोर सादर करण्याबाबत थोडीफार दिखावा करायची, पण आता तिने हे सर्व करणे बंद केले आहे. आडनाव आणि मंदिर-मशिदीला भेट देण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत साराने अनेकांची तोंड बंद केली आहेत.
‘गलाट्टा इंडिया’शी बोलताना सारा म्हणाली, “माझा जन्म एका सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताकातील धर्मनिरपेक्ष कुटुंबात झाला. विनाकारण बोलण्यावर तिचा विश्वास नसल्यामुळे चुकीबद्दल बोलण्याची गरज कधीच वाटली नाही. पण, चुकीच्या विरोधात उभे राहण्याची भावना माझ्यात आहे. त्यामुळे, हे फक्त माझ्याबरोबरच नाही तर माझ्या आजूबाजूच्या कोणालाही घडताना दिसले तर मी त्याच्या पाठीशी उभी राहीन”. साराने सांगितले की, “लोकांना तिचे काम आवडत नसेल तर काही फरक पडत नाही. पण वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाच्या आहेत. त्यांच्यावर कोणाचाही अधिकार नाही. माझी धार्मिक श्रद्धा, माझी खाण्याची आवड, मी विमानतळावर कसे जायचे, हा सर्व माझा निर्णय आहे. यासाठी मी कधीही माफी मागणार नाही”.
सारा ही अभिनेत्री अमृता सिंग व अभिनेता सैफ अली खान यांची मुलगी आहे. ती अनेकदा मंदिरांमध्ये धार्मिक ठिकाणी फोटो काढते, जी तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असल्याचे ती म्हणते. साराने स्पष्ट शब्दांतून लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे, मंदिर असो की मशीद, साराची प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा आहे. आता साराने ही आपली निवड असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असंही अभिनेत्रीच म्हणणं आहे.