बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या चित्रपटांपासून लांब असलेला दिसत आहे. २०१९ साली तो ‘रंगीला राजा’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता. त्याने १९८६ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या. त्याच्या सर्व भूमिकांना प्रेक्षकांनी खूप पसंतही केले. यादरम्यान तो १९८७ साली सुनीता आहुजाबरोबर लग्नबंधनात अडकला. पण त्याने लग्न लगेच सगळ्यांसमोर येऊ दिले नाही. पण आता लग्नाच्या इतक्या वर्षांनी ते पुन्हा एकदा सुनीता यांच्याबरोबर लग्नबंधनात अडकले आहेत. (Govinda married with sunita )
गोविंदा व त्याची पत्नी सुनीता हे दोघेही ‘डान्स दिवाने’च्या सीजन ४ मध्ये आले होते. तेव्हा परीक्षक माधुरी दीक्षितने त्यांना गपचूप लग्न करण्याबद्दल विचारले. ती म्हणाली की, “गोविंदा, तुमचं लग्न कधी झालं? आम्हाला काहीच माहीत नाही”. त्यावर सुनीता यांनी सांगितले की, “आमच्या लग्नाचे फोटो नाहीत”. पण त्यावर माधुरी लगेच म्हणाली की, “फोटो नाही आहे तर काय झालं? ‘डान्स दिवाने’ चं आता कुटुंब आहे. आम्ही तुमचं लग्न लाऊन देऊ”. त्यानंतर गोविंदा व सुनीता यांना मंचावर बोलावले. त्या दोघांनी एकमेकांना हार घातले. दोघांनीही गुलाबी रंगाचे कपडे घातले होते. हार घातल्यानंतर त्या दोघांनी डान्सदेखील केला. ते दोघेही खूप खुश दिसत होते.
काही वर्षांपूर्वी गोविंदा सिम्मी गरेवाल यांच्या एका मुलाखतीमध्ये त्याने सुनीताच्या प्रेमात पडल्याचे सांगितले होते. गोविंदाचे काका व सुनीताच्या बहिणीचे लग्न झाले होते तेव्हा सुनीता व त्याची भेट झाली होती. आधी दोघांचं एकमेकांशी पटत नव्हतं. आम्ही सारखे भांडायचो पण आमच्यामध्ये प्रेम हे आधीपासूनच होतं.
गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक विनोदी अभिनेता म्हणून त्याला खूप पसंती मिळाली. ‘पार्टनर’ या चित्रपटामध्ये तो सलमान खानबरोबर दिसला होता. तसेच कतरिना कैफही त्याच्याबरोबर दिसून आली होती. ही जोडी पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तो ‘कुली नं १’, ‘राजा बाबू’, ‘हिरो नं १’ या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका खूप गाजल्या होत्या.