बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रामलल्लाचं दर्शन घ्यायला गेली प्रियांका चोप्रा, लेक आयोध्या म्हणून ओरडू लागली अन्…; नवऱ्याच्या कपाळीही टिळा, व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 21, 2024 | 10:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priyanka Chopra in ayodhya

रामलल्लाचं दर्शन घ्यायला गेली प्रियांका चोप्रा, लेक आयोध्या म्हणून ओरडू लागली अन्...; नवऱ्याच्या कपाळीही टिळा, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपले अस्तित्त्व निर्माण केले आहे. २००० साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब तिने जिंकल्यानंतर तिने काही वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सहजसुंदर अभिनयाने तिला अनेक चित्रपट मिळू लागले. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर तिने हॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तिने हॉलिवूड गायक निक जोनासबरोबर लग्नबांधनातही अडकली. त्यांना एक मुलगीही आहे. प्रियंका अनेकदा भारतात संपूर्ण कुटुंबासहित येत असते. पण आताचा तिचा भारत दौरा थोडा खास आहे. सध्या ती पती निक व मुलगीसह भारतात आली आहे. (Priyanka Chopra in ayodhya)

काही दिवसांपूर्वी प्रियांका ईशा अंबानीच्या घरी एका पार्टीसाठी उपस्थित राहिली होती. ती नुकतीच निक व मुलगी मालतीसह आयोध्येमधील राम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये प्रियांका दर्शनासाठी जात असताना तिने मालतीला उचलून घेतले आहे. ऊन व वाऱ्यापासून तिचा बचाव करण्यासाठी ती तिच्या डोक्यावर पदर ठेवताना दिसत आहे. तिच्या या कृतीबद्दल सोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम झील मेहता वर्षाअखेरीस उरकरणार लग्नसोहळा, सात नव्हे तर दोन फेरे घेणार अन्…; म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

राममंदिरात रामाच्या दर्शनाला जाताना संपूर्ण कुटुंबाने पारंपारिक वेशभूषेमध्ये दिसून आले . प्रियंकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती तर निकने कुर्ता पायजमा घातला होता. जेव्हा प्रियांका मालतीला घेऊनजात असते तेव्हा तीला आयोध्या बोलायला शिकवते. मालतीदेखील बोलण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे अनेकांनी या व्हिडीओला खूप पसंती देत आहेत व प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

आणखी वाचा – “मी माफी मागणार नाही…”, मंदिर-मशिदीत जाण्यावरुन सारा अली खान ट्रोल, अखेर अभिनेत्रीने हिंदू-मुस्लिमांबाबत केलं मोठं भाष्य

या व्हिडीओवर एक नेटकरी म्हणतो की, “हा असा परदेशी कलाकार आहे जो पत्नीच्या परंपरेचा सन्मान करतो”, दुसरा नेटकरी म्हणतो की, “निक जोनास आपल्या परंपरेचा आदर करतो हे पाहून आनंद झाला”, तसेच प्रियांकाच्या व्हिडीओवर नेटकरी म्हणाले की, “ज्या प्रकारे प्रियांकाने आपल्या पदराने मालतीला झाकले आहे तसेच निकच्या कपाळावर टिळा लावण्यासाठीही सांगत आहे, हे सर्व खूप छान आहे”, तर अजून एक नेटकरी म्हणत आहे की, “प्रियांका खरी भारतीय आहे. या व्हिडीओमध्ये जे मी पाहत आहे ते खूप लक्षणीय आहे”.

दरम्यान प्रियांकाच्या भारतदौऱ्याबद्दल खूप कौतुक करण्यात येत असलेले दिसून येत आहे. प्रियंका या ‘सिटाडेल’ या वेबसिरिजमध्ये दिसून आली होती. आता ती ‘जी ले जरा’ या हिंदी चित्रपटामध्ये दिसून येऊ शकते. यामध्ये तिच्याबरोबर आलिया भट्ट व कतरिना कैफही दिसण्याची शक्यता आहे.  

Tags: aayodhyaindiamalti merienik Jonaspriyanka chopraram mandir
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
kareena kapoor son jeh

Video : करीना कपूरच्या छोट्या लेकाने विमानतळावर आल्यानंतर केलं काही भलतंच, डोक्यावर जोरात हात मारला अन्…; व्हिडीओची तुफान चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.