आपण अभिनेता शंतनू मोघे यांना रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारताना पाहिलं आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका ही त्यांच्यासाठीच लिहिली गेली आहे असं वाटतं. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपतींची भूमिका लोकप्रिय ठरली. त्यांनी साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. शंतनू यांचं या भूमिकेसाठी अभिनेता अमोल कोल्हे यांनी नाव सुचवलं होतं. या भूमिकेसाठी त्यांची निवड होणं हे ते स्वतःचं भाग्यच समजतात.(shantanu moghe worship Chatrapati shivaji maharaj)
याबाबतचा अनुभव शंतनू यांनी ‘इट्स मज्जा’च्या एका कार्यक्रमात सांगितला. “माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मिळणं हे स्वप्नवतच होतं. अमोल कोल्हे यांनी साकारलेली महाराजांची भूमिका सगळ्यांच्या आठवणीत आहे. पण त्यानंतर मी या भूमिकेला न्याय देऊ शकेल का या माझ्या प्रश्नावर पुर्णविराम स्वतः अमोल कोल्हे यांनीच लावला. या भूमिकेसाठी त्यांनी दिलेला विश्वास व मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वाचं ठरलं”.
वाचा – शंतनू का करतात शिवरायांची पूजा?(shantanu moghe worship Chatrapati shivaji maharaj)
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना ते म्हणाले, “ मी शिवरायांचा खूप मोठा भक्त आहे. मी त्यांची रोज पूजा करतो, आरतीही करतो. रोजच्या जीवनात शिवराय हे एक सगळ्यांसाठी आदर्श आहेत. एक मुलगा म्हणून, एका वडील म्हणून, एक नवरा म्हणून आपल्या जबाबदाऱ्या प्रत्येकाने कशाप्रकारे पुर्ण कराव्यात यांच उत्तम उदाहरण म्हणजे शिवराय. शिवरायांकडून घ्यावं तितकं कमीच. त्यांची कृपादृष्टी असल्याशिवाय ही भूमिका साध्य झाली नसती”.
“मी रोज त्यांची पूजा करतो. मी त्यांचे विचार रोजच्या जीवनात अर्धा टक्का जरी समाविष्ट केले तरी माझं जीवन सार्थकी लागेल”. शंतनू यांनी आजपर्यंत बऱ्याच भूमिका साकारल्या. पण महाराजांची भूमिका ही त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची होती. आजही शिवजयंती असो किंवा शिवराज्याभिषेक सोहळा शंतनू यांनी साकारलेल्या शिवरायांच्या रुपाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांनी साकारलेल्या भूमिकेतून शिवराय सगळ्यांपर्यंत पोहोचले हे लक्षात येते.