प्रत्येकाला आयुष्यात जगत असताना विविध अनुभव येत असतात. कधी ते अनुभव चांगले असतात तर कधी ते वाईट असतात. असे चांगले-वाईट अनुभव कलाकारांच्या वाट्यालाही येत असतात. प्रत्येक कलाकार संघर्षातूनच पुढे आलेला असतो. पण संघर्षाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. असेच न ऐकलेले किस्से ऐकायला आपल्याला नेहमी आवडतात. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेता मिलिंद गवळी यांनी वास्तूबाबत आलेला अनुभव सांगितला.(Milind told him home vibes)
प्रत्येकाला राहत्या ठिकाणी चांगले–वाईट अनुभव येत असतात. असेच काहीसे अनुभव मिलिंद गवळी यांनाही आले. याबाबत त्यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “माझे बाबा पोलीस होते त्यामुळे आम्ही पहिल्यापासून सरकारी वसाहतीत राहत आलो. पण जेव्हा बाबांची निवृत्ती झाली तेव्हा आमच्यासमोर राहायचं कुठे हा प्रश्न उभा राहिला. आम्ही तोपर्यंत मुंबईत स्वतःचं घर घेतलंच नव्हतं. काही दिवसांनी आम्ही भाड्याच्या घरात राहायचा निर्णय घेतला. माहिममध्ये आम्ही भाड्याने घर घेतलं. पण ते घर आमचं कधीच झालं नाही. त्या वास्तूमध्ये आम्हाला खूप त्रास भोगावा लागला”.
वाचा – मिलिंदला घरात नेमका कोणता अनुभव आला? (Milind told him home vibes)
पुढे त्यांनी खुलासा करत सांगितलं, “ज्या घरात आम्ही राहत होतो तिथे खूप नकारात्मकता होती. आम्ही सहाव्या मजल्यावर राहत होतो. तिथे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडणं होतच असायची. त्या बिल्डिंगच्या लिफ्टची अडचण होती. याचा जास्त त्रास आम्हाला आई आजारी होती तेव्हा झाला. आई खूप आजारी पडली. डॉक्टरकडे नेताना तिला खुर्चीत बसवून उचलून न्यावं लागायचं. त्या घरात माझ्या आईला खूप त्रास सहन करावा लागला”.
मिलिंद यांनी त्यानंतर नवीन घर घेतलं. पण ते बघायला त्यांची आई या जगात नव्हती. याची त्यांना प्रत्येकवेळी खंत वाटते. तिच्या आर्शिवादानेच त्यांना मुंबईत स्वतःचं घर घेणं शक्य झालं. मिलिंद यांचं आता एक अंधेरीत तर दुसरं ठाण्यात अशी दोन घरं आहेत.