गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

खून, वाद-विवाद, गुन्हेगारी अन्…; ६०च्या दशकातील गँगस्टर दुनिया, ‘बम्बई मेरी जान’चा ट्रेलर पाहिलात का?

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 5, 2023 | 11:24 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bambai meri jaan trailer viral

bambai meri jaan trailer viral

ओटीटी प्लेटफॉर्मवर आतापर्यंत विविध सीरिजतून प्रेक्षकांचं बरंच मनोरंजन झालं आहे. आता २०२३च्या वर्षी प्रेक्षक एका जबरदस्त वेब सीरिजची वाट पाहत आहेत. नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर खून, वाद-विवाद, गुन्हेगारी यांचा मेळ घातल एक वेब सीरिज येत आहेत. ‘बम्बई मेरी जान’या बहुचर्चित वेब सीरीजचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. आता या सीरिजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमध्ये केके मेनन व अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. ही कथा ६० च्या दशकातील एका गँगस्टरची आहे. त्यामुळे या सीरिजमध्ये बरीच अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. जे प्रेक्षक मनोरंजनात अ‍ॅक्शन, थ्रिलरच्या शोधात असतील त्यांना ही सीरिज नक्कीच आवडेल. (bambai meri jaan trailer viral)

गँगस्टर दारा कादरी याच्यावर ही सीरिज आधारीत आहे. ज्याचे वडील इस्माईल कादरी हे एक प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत. एकीकडे पिता पोलीस तर पुत्र गँगस्टर असा संघर्ष यात पहायला मिळणार आहे. दुसरीकडे मुंबईतील गुंडांचे वाढतं वर्चस्व यात चित्रीत करण्यात आलं आहे. त्यामुळे या सीरिजमध्ये आजच्या मुंबईचे चित्रीकरण नसून ७० च्या दशकातील कपडे, भाषा व वातावरण असा ओल्ड बॉंम्बेचा लूक पाहायला मिळतो. या कथेवर आजपर्यंत विविध चित्रपट व मालिका बनवल्या गेल्या असल्या तरीही ही सीरिज या कथेतून मुंबईच्या वेगळ्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाईल. त्या कथेतील एक भाग निवडून फरहान अख्तरने एका नव्या रुपात ही सीरिज पडद्यावर आणली आहे.

आणखी वाचा – वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गमावला जीव, डेंग्यु ठरला निमित्त, शेवटची पोस्ट पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

या सीरिजमध्ये के के मेनन इस्माईल कादरी याच्या भूमिकेत दिसत आहेत. जे दारा कादरीचे वडील व एक प्रमाणिक पोलीस अधिकारीची भूमिका साकारत आहेत. केकेचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. आजही प्रेक्षक त्याच्या विविध भूमिकांसाठी आतूर असतात. त्याच्या अभिनयातील अचूकता व सहजता नेहमी प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. त्यामुळे या सीरिजमधून केके आपली जादू प्रेक्षकांमध्ये पसरवण्यास सज्ज झाला आहे.

आणखी वाचा – ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंताने घेतलं नवं घर, सोशल मीडियावर पूजा करतानाचे फोटो व्हायरल

केके व अविनाश तिवारी फेम ही सीरिज या महिन्याच्या १४ सप्टेंबरला ओटीटीवर अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पहायला मिळणार आहे. यात कृतिका कामराही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी तिने सैफ अली खानसह तांडव या सीरिजमध्येही काम केलं होतं.

Tags: amazon prime videobambai meri jaannew seriestrailer viral
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Gaurav More New Look

"केस परत आले", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची पोस्ट, काही दिवसांपूर्वीच कापले होते केस पण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.