मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : स्वामींचा फोटो, छोटं स्वयंपाक घर अन्…; ‘चला हवा येऊ द्या’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं चाळीतलं घर पाहिलंत का?

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 9, 2023 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Snehal home tour

Snehal home tour

कलाकारांचं पडद्यावरचं आयुष्य आपण नेहमीच पाहतो तसं त्यांच वैयक्तिक आयुष्यही असतं. कलाकार जसा रुपेरी पडद्यावर झळकला की मग तो प्रेक्षकांचा होतो. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी मग प्रेक्षकवर्ग जोडला जातो. त्यामुळे कलाकारांच्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्यांमध्ये लागून असते. कलाकारही सोशल मीडियावर कामाव्यतिरिक्त स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. चाहतावर्गही त्यांना लाईक, कमेंट करत भरभरून प्रेम देत असतात. कलाकारांबाबत आणखी एक गोष्ट चाहते जाणून घ्यायला उत्सुक असतात. ती म्हणजे त्यांच घरं कसं आहे?. अशाच एका कलाकाराच्या घराची गोष्ट जाणून घेऊया.(Snehal home tour)

आपलं घर व घराचा एक कोपरा सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो. कारण त्या कोपऱ्यात आपल्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. अशाच आठवणी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील लाडकी अभिनेत्री स्नेहल शिदमनेही शेअर केल्या आहेत. ‘इट्स मज्जा’च्या ‘घराची गोष्ट’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या घराबाबत गोष्टी सांगितल्या. स्नेहलचं बालपण चाळीतच गेलं. ती आताही चाळीतच राहते. आतापर्यंतच्या प्रवासातील चाळीतल्या आठवणी खूप खास आहेत. कठीण काळ व कुटुंबाबरोबर केलेला प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना केल्याने तिला आज आपल्या आयुष्यात उभं राहता आलं.

वाचा – स्नेहलचं चाळीतलं घर आहे तरी कसं?(Snehal home tour)

आणखी वाचा – “माझ्या आईच्या चारित्र्यावर तेव्हा…”, काळ्या रंगावरुन हिणावणाऱ्यांना अतिशा नाईकचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “गोरं होण्यासाठी…”

मुंबईतील पारंपारिक बैठीचाळ संस्कृती व त्यांची मांडणी त्याच प्रकारच्या चाळीत स्नेहल राहते. घराघरात घर असं करत कधी स्नेहलचं घर येईल हे ही कळणार नाही. घर अगदी लहान आहे पण अगदी परिपूर्ण आहे. संपन्नतेचा वावर तिच्या घरात जाणवला. घरात गेल्या गेल्या झालेलं स्वामी समर्थ, विठूरायाचं दर्शन प्रवासाचा सगळा थकवा विसरायला लावतं. एका बाजूला स्वयंपाक घर आणि दुसऱ्या बाजूला नीटनेटकी सगळ्याची ठेवण त्यामुळे घर अगदी शोभून दिसतं.

View this post on Instagram

A post shared by Snehal Shidam (@snehalshidam)

आणखी वाचा – “पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यानंतर बाबांजवळ गेले अन्…”, अतिशा नाईकने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “त्यांनी मला कधीही…”

स्नेहलने तिच्या आवडत्या कोपऱ्याबाबत आठवण सांगतली. “आमचं घर खूप लहान आहे. जागा जरी कमी असली तरी हा बेड आहे जिथे मी बसते. इथे बसून नेहमी सकारात्मक वाटतं. माझी आवडती जागा हिच आहे”, असं म्हणत तिने तिच्या घराची गोष्ट सांगितली. स्नेहलने कामाची सुरूवात इथूनच केली. आजही तिची मुळं या जागेशी जोडली गेली आहेत.

Tags: chala hava yeu dyahome tourMarathi programsnehal shidam
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Priya bapat told about umesh kamat

“तेव्हा आम्ही एकमेकांचं तोंडही बघत नव्हतो कारण…”, प्रियाने सांगितलेला उमेशबरोबर भांडण झाल्याचा किस्सा, म्हणालेली, “नवरा-बायको…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.