अभिनेता शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात झाला. इटलीमध्ये हा अपघात झाला असून गायत्री व तिचा पती विकास ओबेरॉय हे सुखरूप आहे. मात्र, या अपघातात एका वृद्ध जोडप्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. (Swades fame Actress Car Accident)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायत्री व तिचा पती विकास ओबेरॉय इटलीतील सार्डिनिया येथील आलिशान कारच्या शर्यतीत सहभागी झाले होते. या दाम्पत्यांच्या लॅम्बोर्गिनी कारच्या मागे फेरारी व इतर अनेक आलिशान कार धावत होत्या. यावेळी एका कॅम्पर व्हॅनला ओव्हरटेक करताना अभिनेत्रीची कार पुढे असलेल्या फेरारीला धडकली. त्याचवेळेस पुढे असलेली फेरारी कार कॅम्पर व्हॅनला धडकली आणि ती व्हॅन उलटली. व्हॅन पलटी होताच फेरारीने पेट घेतला. या अपघातात त्या फेरारीमध्ये असलेल्या मेलिसा क्रौटली आणि मार्कस क्रौटली या स्वित्झर्लंडमधील वृद्ध जोडप्याचा मृत्यू झाला.
हे देखील वाचा – रजनीकांतच्या आगामी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांची एन्ट्री! तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा येणार एकत्र, पोस्टर प्रदर्शित
गायत्रीने फ्री प्रेस जरनलला दिलेल्या माहितीनुसार, ती व तिचा पती या अपघातात सुखरूप बचावले असून यात मृत्यू झालेल्या जोडप्याबद्दल तिने दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, या अपघाताचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला. ज्यामध्ये या अपघाताची तीव्रता किती आहे, याचा आपल्याला अंदाज लावता येईल.
हे देखील वाचा – अक्षय कुमारचा ‘OMG २’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, वाचा कधी व कुठे पाहता येणार चित्रपट?
Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023
अभिनेत्री गायत्री जोशीने २००० मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर २००४ साली ‘स्वदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिची गीता ही भूमिका प्रचंड गाजली असून या भूमिकेसाठी तिला पदार्पणाचे अनेक पुरस्कार मिळाले आहे. मात्र, या चित्रपटानंतर गायत्रीने बॉलीवूडला रामराम केला आणि उद्योगपती विकास ओबेरॉयसोबत विवाहबंधनात अडकली. या जोडीला दोन मुलं असून ती तिच्या ती तिच्या संसारात रमली आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री अनेकदा मुंबईत स्पॉट झाली असून गेल्यावर्षी ती तिच्या पतीसह हृतिक रोशनच्या गेट-टूगेदर पार्टीला दिसली होती.