‘बिग बॉस’ या टीव्ही शोमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रोशेल राव व तिचा पती अभिनेता कीथ सिक्वेरा यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. रोशेल व कीथ नुकतेच आई-बाबा झाले असून दोघांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. लग्नाच्या तब्बल पाच वर्षांनी रोशेल आणि किथ यांच्या घरी परी आली आहे. १ ऑक्टोबरला तिने मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियाद्वारे अभिनेत्रीने ही बातमी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. (Rochelle Rao & Keith Sequeira blessed with Baby Girl)
रोशेलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये बाळाची झलक दाखवण्यात आली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, “सर्वात मोठ्या आशीर्वादासाठी आम्ही देवाचे आभार मानतो. आमची लहान परी बेबी सिक्वेराचा जन्म १ ऑक्टोबर २०२३ रोजी झाला. या अप्रतिम प्रवासात तुमचं हे अतूट प्रेम आणि समर्थनासाठी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.”
हे देखील वाचा – ‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात, वृद्ध जोडप्याचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
२०१८ मध्ये रोशलने अभिनेता कीथ सिक्वेराशी विवाहबंधनात अडकली. त्यानंतर लग्नाच्या 5 वर्षांनी अभिनेत्रीने मुलीला जन्म दिला आहे. रोशेलच्या गरोदरपणाच्या काळातील फोटोशूट्सची त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती. अभिनेत्री होण्यापूर्वी रोशेलने २०१२ मध्ये मिस इंडियाचा खिताब पटकावला होता. त्यानंतर ती ‘बिग बॉस’सह अनेक रिऍलिटी शोमध्ये झळकली आहे.