बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘OMG २’ चित्रपट गेल्या ११ ऑगस्टला देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ चित्रपटाला चांगली टक्कर दिली होती. जरी बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ने बाजी मारली असली, तरी ‘OMG २’ने चांगली कमाई केली होती. चित्रपटाचा विषय व कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. बॉक्स ऑफिसनंतर आता हा चित्रपट ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून याबाबतची एक बातमी नुकतीच समोर आली आहे. (OMG 2 OTT release date)
अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी व यामी गौतम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘OMG २’ येत्या ८ ऑक्टोबरला ‘Netflix’ या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा नेटफ्लिक्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे दिली आहे. त्यामुळे ज्यांना हा चित्रपट सिनेमागृहात पाहता आला नाही, त्यांना हा चित्रपट आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा – रंगभूमीवर रंगणार ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असा प्रयोग; एका नाटकात शरद पोंक्षे तर दुसऱ्या नाटकात ‘हा’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड’ चित्रपटाचा सीक्वेल असलेल्या ‘OMG २’ चित्रपट लैंगिक शिक्षणावर आधारित आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘A’ सर्टिफिकेट दिलं होतं. असं असूनही समीक्षक व प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले होते. ‘OMG २’च्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, अमित राय दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता.
हे देखील वाचा – उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा? ‘ते’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल, ती व्यक्ती नेमकी कोण?
अक्षय कुमारचे आगामी काळात अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापैकी ‘मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू’ हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर ‘वेलकम टू द जंगल’ २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, अभिनेत्याने काल ‘स्काय फोर्स’ चित्रपटाची घोषणा केली, तो २ ऑक्टोबर २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. एकूणच, येणाऱ्या काळात अक्षयचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असून प्रेक्षक याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.