दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांचा काही महिन्यांपूर्वी ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याला जगभरातील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. चित्रपटाला मिळालेल्या या अभूतपूर्व यशानंतर आता ते त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. दरम्यान, सुपरस्टारच्या एका नव्या चित्रपटाची काल घोषणा झाली असून याच चित्रपटाबद्दल आणखी एक बातमी समोर आली आहे. (Amitabh Bachchan and Rajnikanth reunites after 32 years)
रजनीकांतच्या ‘थालयवा १७०’ या नव्या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. ज्याचे दिग्दर्शन ‘जय भीम’ फेम टीजे ज्ञानवेल करणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील कलाकारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. ज्यामध्ये फहाद फासिल, राणा डग्गुबत्ती यांसारखे अनेक कलाकार चित्रपटात दिसणार आहे. रजनीकांतच्या या आगामी चित्रपटात आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनदेखील दिसणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व रजनीकांत तब्बल ३२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे.
हे देखील वाचा – अक्षय कुमारचा ‘OMG २’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, वाचा कधी व कुठे पाहता येणार चित्रपट?
चित्रपटाचे निर्माते लायका प्रॉडक्शनने ट्विटरवर ही घोषणा केली आहे. निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांचे पोस्टर प्रदर्शित केले. तर या पोस्टमध्ये निर्मात्यांनी बॉलिवूडच्या महानायकाचे स्वागत करत त्यांचे कौतुक केले आहे. अमिताभ व रजनीकांत १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम’ चित्रपटात शेवटचे एकत्र दिसले होते.
Welcoming the Shahenshah of Indian cinema ✨ Mr. Amitabh Bachchan on board for #Thalaivar170🕴🏼#Thalaivar170Team reaches new heights with the towering talent of the one & only 🔥 @SrBachchan 🎬🌟😍@rajinikanth @tjgnan @anirudhofficial #FahadhFaasil @RanaDaggubati… pic.twitter.com/BZczZgqJpm
— Lyca Productions (@LycaProductions) October 3, 2023
हे देखील वाचा – Video : क्रांती रेडकरने पहिल्यांदाच दाखवली तिच्या जुळ्या मुलींची झलक, व्हिडिओ पाहून सेलिब्रिटीही करत आहेत कौतुक
अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, गेल्या ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ चित्रपटात ते शेवटचे दिसले होते. लवकरच ते मुलगी ऐश्वर्या रजनीकांतच्या ‘लाल सलाम’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर लोकेश कनगराज यांच्या आगामी प्रोजेक्टमध्येही झळकणार आहे.