बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कारण, तिची बहुचर्चित वेबसीरिज ‘ताली’ नुकतीच ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली आहे. या वेबसीरिजमध्ये सुश्मिता सेन सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या भूमिकेत दिसली असून तिच्या या भूमिकेला आणि वेबसीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्रीचे नाव आतापर्यंत अनेकांशी जोडले गेले आहे. शिवाय, काही दिवसांपूर्वी ती ललित मोदीसोबतच्या नात्यांमुळेदेखील चर्चेत आली असली, तरी तिने अजूनही लग्न केलेलं नाही. अशातच सुष्मिताला लग्न न करण्याचे कारण विचारण्यात आले असता तिने एक मोठे वक्तव्य केले आहे. (Sushmita Sen)
४७ वर्षीय अभिनेत्री सुश्मिता सेन अविवाहित असून तिने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. सुश्मिता तिच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसमोर व्यक्त होते. अशातच तिने एक मुलाखत दिली, ज्यात लग्न न करण्यामागचं कारण सांगताना एक मोठं वक्तव्य केलं आहे.
हे देखील वाचा – “ती कधीच आई होऊ शकत नाही”, आदिल खानच्या आरोपांवर भडकली राखी सावंत, म्हणाली, “माझं गर्भाशय…”
तुझ्या मुलींना वडिलांची उणीव भासत नाही का? असा प्रश्न सुष्मिता विचारण्यात आला. यावर तिने म्हटलं, “अजिबातच नाही. त्यांना वडिलांची गरजच नाही. तुमच्याकडे जे आहे, त्याची उणीव तुम्हाला जाणवते. पण जे तुमचं नाहीच आहे, ते तुम्ही कसं गमवाल? जेव्हा मी माझ्या मुलींसमोर मला लग्न करायचं आहे, असं बोलले. तेव्हा “पण का? नेमकं कशासाठी?” अशी त्यांची प्रतिक्रया होती. तेव्हा मी त्यांना म्हणाले, की मला नवरा हवा आहे आणि त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. या गोष्टीवरुन आम्ही अनेकदा या गोष्टीची चेष्टा करत असतो”.
हे देखील वाचा – योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले रजनीकांत, ट्रोल झाल्यानंतर म्हणाले, “साधू असो वा…”
ललित मोदीआधी अभिनेत्री सुश्मिता सेनचं अनेक जणांशी नाव जोडलं गेलं आहे. तिचे रोहमन शॉलसोबत अफेअरच्या चर्चादेखील रंगल्या होत्या. पण काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. मात्र, ब्रेकअपनंतरही या दोघांमध्ये मैत्री कायम असून हे दोघे अनेकदा स्पॉटदेखील झालेले आहे. अभिनेत्री सध्या चित्रपटांत दिसत नसली, तरी वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. (Sushmita Sen talks about her marraige)