ड्रामा क्वीन राखी सावंतचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. राखीने तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीवर काही महिन्यांपूर्वी गंभीर आरोप केले. त्यानंतर आदिलला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. आता तो तुरुंगातून बाहेर आला आहे. आदिलने राखीवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच राखीला धडा शिकवणार असल्याचंही तो म्हणाला. आदिलने पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले. यावर आता राखीने प्रतिक्रिया दिली आहे.
राखी कधीच आई होऊ शकत नाही. तिच्या युट्रसचं ऑपरेशन झालं असल्याचं आदिलने सांगितलं. आता यावर राखीने उत्तर दिलं आहे. ती तिच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरलाच कॅमेऱ्यासमोर घेऊन आली आहे. डॉक्टरांबरोबरचा व्हिडीओ शेअर करत राखी म्हणाली, “देव प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही म्हणून त्यांनी डॉक्टरांना बनवलं आहे. काही महिन्यांपूर्वी माझं युट्रसचं ऑपरेशन झालं होतं. आदिलबरोबर लग्न केल्यानंतर मला मुल हवं होतं”.
“पण वेळेआधीच जर मी गरोदर राहिले असते तर युट्रसमध्ये फायब्रॉइडचे प्रमाण वाढलं असतं. ज्या डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं आज मी त्यांच्याजवळ आली आहे”. असं म्हणत राखी डॉक्टर वीना यांच्याकडे कॅमेरा फिरवते. दरम्यान वीना म्हणतात, “राखी आता आई बनू शकते. ती आता पूर्णपण ठिक आहे. मासिक पाळीही तिला नियमित येत आहे”. राखीने डॉक्टरांकडे जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
पुढे राखी म्हणाली, “आदिल पूर्ण जगाला ओरडून सांगतो की, मी आई बनू शकत नाही. पण डॉक्टरांनी आता सत्य समोर आणलं आहे. आदिलला मला बदनाम करायचं आहे”. आदिल करत असलेले आरोप खोटे असल्याचं राखीचं म्हणणं आहे. आता राखी व आदिलचं हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचणार हे पाहावं लागेल.