अभिनेत्री राखी सावंत रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मध्यंतरी आदिल खान दुर्रानीमुळे ती विशेष चर्चेत होती. राखी सावंतने आदिल खानवर गंभीर आरोप केल्याप्रकरणी आदिल खानला तुरुंगवासात जावं लागलं. मात्र आता आदिल खान तुरुंगातून बाहेर आला आहे. तुरुंगातून बाहेर येताच त्याने परारांजींसमोर पत्रकार परिषद घेऊन लवकरच राखीबद्दलचा खुलासा करणार असल्याचं सांगितलं. आणि त्यानुसार आदिल खानने पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेत आदिलने राखीच्या अनेक छुप्या गोष्टींचा खुलासा केला. (Adil Khan On Rakhi Sawant)
तुरुंगातून बाहेर येताच आदिलने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्याने राखीच्या अनेक छुप्या गोष्टींचा खुलासा केला. आदिल खानने राखीवर गंभीर आरोप केले आहेत. राखीला धडा शिकवण्यासाठी त्याने राखीवर आरोप करत त्याचा मीडियासमोर पर्दाफाशही केला आहे. आदिल खान दुर्राणीने राखी सावंतचा पर्दाफाश करत म्हटले की, ‘मला खूप त्रास झाला आहे. या ६ महिन्यात मला किती त्रास झाला हे सांगता येणं कठीण आहे. आई वडिलांसह संपूर्ण कुटुंबालाही त्रास भोगावा लागला, असं म्हणत त्याने राखीवर आरोप करायला सुरुवात केली.
राखीवर आरोप करत असताना त्याने राखीच्या आईबद्दल भाष्य केलं. आदिल खान म्हणाला की, “राखीच्या आईवर माझं खूप प्रेम होतं. मी पण त्यांचा आवडता होतो. त्या नेहमीच मला आशीर्वाद देत असत. आठवड्यातून एकदा मी त्यांना भेटायला जायचो, तेव्हा त्या मला राखीला सुधारायला सांगायच्या. दरमहा मी त्यांना ३० हजार रुपयेही द्यायचो. मात्र ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झालं तेव्हा मी त्यांच्याजवळ अर्ध्या तासात पोहोचलो”.

“मात्र मीडिया तिथे न आल्याने राखी आईजवळ गेली नाही. मीडिया आल्यावर तिने रडण्याचं नाटक सुरु केलं. तर तिचा भाऊ राकेशच आईवर खूप प्रेम होत, तो खूप रडत होता. आई गेल्यावर मात्र राखीने ड्रामा केला होता. आईच्या निधनाच्या दिवशी ती बिर्याणी, कबाब खात होती”.