मंगळवार, एप्रिल 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

डिनर डेट, रोमॅंटिक अंदाज अन्…; लग्नाला ३ महिने होताच पियुष रानडेने बायकोला दिलं सरप्राइज, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 7, 2024 | 10:32 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding

डिनर डेट, रोमॅंटिक अंदाज अन्...; लग्नाला ३ महिने होताच पियुष रानडेने बायकोला दिलं सरप्राइज, फोटो व्हायरल

मराठी सिनेसृष्टीत झालेली कलाकारांची लग्न बरीच चर्चेत राहिली. एकामागोमाग एक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकत गेल्या. अशातच एक मराठमोळी कलाकार जोडी काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकली आहे. मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री व अभिनेत्याने गुपचूप लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ही जोडी म्हणजे अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे. सुरुची व पियुष यांनी लग्न करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. थेट लग्नाचे फोटो शेअर करत दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली सोशल मीडियावरुन दिली. (Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding)

सुरुची व पियुष यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. शाही थाटामाटात व अगदी पारंपरिक अंदाजात त्यांनी हा विवाहसोहळा उरकला. लग्नासाठी सुरुची व पियुष यांचा खास लूक पाहणंही रंजक ठरलं. अशातच आता पियुष व सुरुची यांच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. लग्नाला तीन महिने पूर्ण होताच त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुरुची व पियुष या त्यांच्या खास दिवशी डेटवर गेले असल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘बालक पालक’ व ‘आनंदी गोपाळ’ फेम भाग्यश्री मिलिंद सध्या काय करते?, अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीपासून लांब का आहे?, जाणून घ्या…

लग्नानंतर पियुष व सुरुची त्यांचे लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसले. लग्न झाल्यावर कामाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून दोघेही फिरायला देखील गेले होते. अशातच आता लग्नाला तीन महिने पूर्ण होताच पियुष व सुरुची हे डेटवर गेले आहेत. पियुषने त्याच्या बायकोला हे खास सरप्राइज दिलं असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुचीने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. यांत दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये डिनरला गेलेले पाहायला मिळत आहे. सुरुचीसाठी ‘Happy 3 Month Darling’, असं लिहिलेला एक खास केकही पियुषने ऑर्डर केला आहे. ही स्टोरी शेअर करत, “जेव्हा तुमचा नवरा तुम्हाला असं खास सरप्राइज देतो”, असं कॅप्शन दिलं होतं.

आणखी वाचा – अखेर चर्चा खऱ्या ठरल्या, इम्रान खान पत्नी अवंतिकापासून विभक्त, लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या नात्याबद्दलही केला खुलासा, म्हणाला…

लग्नानंतर पियुष व सुरुची त्यांच्या संसारात रमले असून दोघांनीही कामालाही सुरुवात केली आहे. पियुष हा सध्या ‘काव्यांजली’ मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर सुरुचीने ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून मालिकाविश्वात कमबॅक केलं आहे.

Tags: entertainmentmarathi actormarathi actressPiyush RanadeSuruchi AdarkarSuruchi Adarkar Piyush RanadeSuruchi Adarkar Piyush Ranade Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding

शाहरुख, सलमान व आमिर खान लग्नामध्ये जाण्यासाठी किती पैसे घेतात?, अंबानी कुटुंबियांकडून घेतले तब्बल इतके रुपये

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.