बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानंतर तो फारसा कुठल्या चित्रपटात दिसला नाही. पण मागच्या काही काळापासून इम्रान त्यांच्या पत्नीबरोबरच्या बिघडलेल्या नातेसंबंधांमुळे चांगलाच चर्चेत आहेत. इम्रान खानने २०११ मध्ये अवंतिका मलिकबरोबर लग्न केलं होतं. मात्र, २०१९ मध्ये या दोघांमध्ये भांडण सुरू असल्याचं समोर आलं. त्यानंतर सातत्यानं या दोघांमध्ये घटस्फोट झाल्याच्या अनेक चर्चा रंगताना दिसल्या आणि अखेर चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत.
इम्रान खानने स्वतः याबद्दलचा खुलासा केला आहे. इम्रान खानने त्याचे लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या नात्याबद्दल सांगितले असून २०१९ मध्ये त्याची माजी पत्नी अवंतिका मलिक हिच्याशी घटस्फोट झाल्याचेही अभिनेत्याने उघड केले. वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इम्रानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केले. यावेळी इम्रानने लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या त्याच्या नात्याला दुजोरा दिला. त्याने लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या अनेक अफवा खऱ्या असल्याचेही मान्य केले. तसेच २०१९ मध्येच त्याने अवंतिकापासून घटस्फोटाचा घेतला असल्याचाही खुलासा केला.
अवंतिकापासून घटस्फोट घेतल्याच्या १ वर्षांनंतर तसेच लेखाही तिच्या जोडीदाराबरोबर विभक्त झाल्याच्या काही दिवसांनी आम्ही दोघे लॉकडाऊनदरम्यान एकत्र आल्याचे सांगितले. यादरम्यान, त्याच्याबद्दल आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केल्या जाणाऱ्या अनेक चर्चांवर इम्रानने निराशा व्यक्त केली. तसेच त्याच्या कुरूप स्वभावाबद्दल व एक व्यक्ती म्हणून स्वतःच्या स्वायत्ततेबद्दल त्याने रागही व्यक्त केला.
दरम्यान, इम्रान नुकताच आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नात सहभागी झाला होता. तसेच याआधी त्याने अवंतिकाबरोबरच्या नात्याबद्दल कुठेही सांगितले नव्हते. अशातच त्याने पाहिल्यांदाच अवंतिकाबरोबरच्या घटस्फोटाबद्दल व लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या रिलेशनबद्दल उघडपणे भाष्य केले आहे.