जगातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सोहळ्याचे अगदी धुमधडाक्यात सेलिब्रेशन झालं. या कार्यक्रमात देशातीलच नव्हे तर परदेशातील कलाकार व दिग्गज मंडळींनी सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढविली. अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात कलाकारांच्या नृत्याने व सादरीकरणाने या सोहळ्याची रंगत वाढविली. आणि या कार्यक्रमातून कलाकार मंडळींनी भरपूर पैसेही कमावले. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने तिच्या दमदार परफॉर्मन्सने साऱ्यांना वेड केलं. (Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding)
अनंत व राधिकाच्या प्री-वेडींगसाठी संपूर्ण बॉलिवूड अवतरलं होतं. बॉलीवूडच्या तिन्ही खानने अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये पहिल्यांदा एकत्र परफॉर्म केले. त्यामुळे या परफॉर्मन्सची अधिक चर्चा रंगली. या चर्चांनंतर आता सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला जात आहे की, या परफॉर्मन्ससाठी तिन्ही खानला त्यांच्या कामगिरीसाठी किती पैसे मिळाले असतील?, या प्रश्नाच्या उत्तराकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.
अनंत व राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये पहिल्यांदाच बॉलिवूडचे तिन्ही खान म्हणजेच शाहरुख खान, सलमान खान व आमिर खान यांनी स्टेजवर एकत्र परफॉर्म केले. साऊथचा सुपरहिट चित्रपट RRR मधील ‘नाटू नाटू’ या हिट गाण्यावर तिघांनी एकत्र डान्स केला. यादरम्यान तिघेही डान्स स्टेप्सचा व गाण्याचा भरपूर आनंद घेताना दिसले. शाहरुख खान, सलमान खान व आमिर खान एकमेकांच्या हिट गाण्यांच्या हुक स्टेप्स करतानाही दिसले.
शाहरुख, सलमान व आमिर या तिघांनी पहिल्यांदाच एकत्र परफॉर्म करत इतिहासच रचला आहे, असं म्हणणं चुकीचं राहणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये परफॉर्म करण्यासाठी या तिघांनी अंबानी कुटुंबाकडून एक रुपयाही घेतला नाही. शाहरुख, सलमान व आमिर खान यांनी एकत्र अंबानी कुटुंबाबरोबरच्या नातेसंबंधांसाठी मोफत परफॉर्म केले आहे. तर अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने तिच्या परफॉर्मन्ससाठी ५४ कोटी रुपये फी घेतली.