शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बालक पालक’ व ‘आनंदी गोपाळ’ फेम भाग्यश्री मिलिंद सध्या काय करते?, अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीपासून लांब का आहे?, जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 6, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Balak Palak and Anandi Gopal fame actress Bhagyashree Milind is entertaining with Gujarati play

‘बालक पालक’ व ‘आनंदी गोपाळ’ फेम भाग्यश्री मिलिंद सध्या काय करते?, अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीपासून लांब का आहे?, जाणून घ्या...

‘बालक पालक’ या लोकप्रिय मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मिलिंद. भाग्यश्री ही मराठी सिनेसृष्टीतील काही अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘बालक-पालक’, ‘आनंदी गोपाळ’, ‘उबूंटू’ अशा अनेक चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे भाग्यश्री खूपच लोकप्रिय आहे.

पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबंटू’ या चित्रपटात भाग्यश्री मिलिंदने ‘गौरी’ ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिचा अभिनय कौतुकास्पद होता. यानंतर समीर विद्वांस यांच्या ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटात अभिनेत्रीने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिससह अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्येही नावाजला गेला होता. तसेच या चित्रपटातील भाग्यश्रीच्या भूमिकेचेही मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते.

मराठीतील ‘बालक पालक’, ‘आनंदी गोपाळ’, ‘उबुंटु’ व ‘३५ टक्के काठावर पास’ या लोकप्रिय चित्रपटांनंतर भाग्यश्री सध्या मराठी मनोरंजन सृष्टीपासून लांब असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री सध्या गुजराती रंगभूमीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गुजराती रंगभूमीवरील ‘एक छोकरी साव अनोखी’ या नाटकाद्वारे भाग्यश्री प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. भाग्यश्री या नाटकात मुख्य भूमिकेत असून या नाटकाला प्रेक्षकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhagyashree Milind (@me.bhagyashree_milind)

आणखी वाचा – सोशल मीडियावर का नाही आहे राणी मुखर्जी?, स्वत:च खुलासा करत म्हणाली, “साधे जीवन…”

‘एक छोकरी साव अनोखी’ हे गुजराती नाटक मराठी रंगभूमीवर गाजलेल्या ‘अनन्या’ या नाटकाचे गुजराती भाषेतील रूपांतर आहे. मराठीतील ‘अनन्या’ नाटकाचे दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले असून अभिनेत्री ऋतुजा बागवे या नाटकात मुख्य भूमिकेत होती. तसेच या नाटकावर आधारित ‘अनन्या’ हा चित्रपटही आला होता. या चित्रपटात अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत होती.

आणखी वाचा – “अश्लील, कौटुंबिक विनोद करुन…”, स्टँडअप कॉमेडीवरुन सलील कुलकर्णींचा संताप, नक्की रोख कोणाकडे?, म्हणाले, “प्रत्येक वाक्यात शिव्या…”

भाग्यश्रीने मराठी चित्रपटांसह ओटीटी माध्यमावरही तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे. ‘अथांग’ या मराठी वेबसीरिजमध्ये भाग्यश्रीने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. दरम्यान, भाग्यश्री आता मराठी चित्रपटांतून दिसत नसली, तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले अनेक स्टायलिश फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.   

Tags: भाग्यश्री मिलिंदमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीआनंदी गोपाळबालक पालकanandi gopalBalak PalakBhagyashree Milindentertainment newsmarathi actressmarathi entertainment newsMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
7th march 2024 today panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस असणार खास, तर ‘या’ राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.