अभिनेत्री सनी लिओनीने भारतात आल्यानंतर अगदी कमी कालावधीत कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. सुरुवातीच्या काळात तिला काही कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. मात्र यासगळ्यामध्ये ती डगमगली नाही. पहिल्यांदाच मुंबईमध्ये आल्यानंतर सनीला राहत्या घरी काही समस्या होत्या. याचबाबत तिने आता भाष्य केलं आहे. तसेच त्यादरम्यान मुंबईच्या पावसामध्ये तिची झालेली अवस्था आणि त्यामधून ती कशी सावरली याविषयी सनीने सांगितलं. (Sunny Share Her Experience)
सनीने एका मुलाखतीत मुंबईच्या पावसामध्ये तिला आलेल्या अनुभवांबाबत सांगितलं. ती म्हणाली, “मला पाऊस खूप आवडतो. पण जोपर्यंत मी घरात आहे तोपर्यंतच मला पावसाची मजा वाटते. मी मुंबईत आल्यानंतर समुद्राजवळं घर घेतलं होतं. पावसाळ्यात त्याठिकाणी भिंतीतून पाणी झिरपायचं. त्यामुळे घरातल्या सामानाचंही नुकसान झालं होतं. मुंबईच्या पावसाने तर माझ्या तब्बल तीन गाड्या खराब झाल्या होत्या. त्यातील दोन गाड्या तर एकाच दिवसात वाहून गेल्या. त्यात एक आठ सीटर मर्सिडीजदेखील होती”.
वाचा – नेमका काय घडला प्रसंग ? (Sunny Share Her Experience)
पुढे झालेल्या नुकसानाबाबत ती म्हणाली, “पावसात मी माझ्या तीन किंमती गाड्या गमावल्या. त्याचं मला खूप दुःख झालं होतं. त्या प्रसंगानंतर मी खूप रडले. यामुळे माझं खूप नुकसान झालं होतं. जेव्हा परदेशातून गाड्या खरेदी केल्या जातात त्यावर अधिक कर भरावा लागतो. मीही तो भरला होता”.
सुरुवातीच्या काळात पावसामुळे तिला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. सनी मुंबईच्या हवामानाबाबत सतर्क झाली. आता तिला हवामानाची कल्पना आली आहे. तिने आता मेड इन इंडिया कंपनीचा ट्रकही घेतला आहे. ज्याला खास पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी बनवण्यात आलं आहे.