मनोरंजन हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाच्या आयुक्त निखळ मनोरंजन पेरण्याचं काम करणारा एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’. बऱ्याच कालावधीपासून हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. विविध विषय आणि विशिष्ट विनोद शैली असलेले कलाकार हे या कार्यक्रमाची विशेषता आहे. दिग्दर्शक सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांनी हास्यजत्रेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे तर समीर चौघुले, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात यांच्यासह अनेक कलाकार आपल्या उत्कृष्ट अभिनयाने महाराष्ट्राची हास्यजत्रा दिवसेंदिवस समृद्ध बनवत आहेत.(Gaurav More US Tour)
काही महिन्यांपूर्वी ‘ महाराष्ट्राच्या हास्यजत्रेने’ प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. परंतु हास्य जत्रेच्या चाहत्यांसाठी लवकरच हास्यजत्रा पुन्हा सुरू होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. हास्यजत्रेच्या नवीन पर्वाची नुकतीच घोषणा देखील करण्यात आली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून ब्रेक घेऊन ही सगळी कलाकार मंडळी आपल्या परदेश दौऱ्यासाठी अमेरिकेला गेली होती. परदेशात ही महाराष्ट्राच्या हास्यजत्रेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यानिमित्ताने इट्समज्जाला दिलेल्या मुलाखतीत अमेरिका दौऱ्याच्या अनेक आठवणी कलाकारांनी सांगितल्या आहेत.
गौरवसोबत अमेरिकेच्या कसिनोमध्ये घडला धम्माल किस्सा
अभिनेता समीर चौघुले, गौरव मोरे, अभिनेत्री वनिता खरात, शिवाली परब, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर यांनी या मुलाखतीत धमाल किस्से शेअर केले आहेत. अमिरिकेतील आठवणींबद्दल सांगताना अभिनेता गौरव मोरेने अमेरिकेतील कसिनोमध्ये घडलेला किस्सा देखील सांगितला आहे.(Gaurav More US Tour)
हे देखील वाचा- पृथ्वीक प्रतापचं मोठं मन, अमेरिकेत शो करत असताना दत्तू मोरेसाठी केली मोठी गोष्ट, प्रियदर्शिनी म्हणते, “पहिल्या दोन शोनंतर…”
अमेरिकेतील एका कसिनोमध्ये हास्यजत्रेतील कलाकार गेले असता तिथे अभिनेता गौरव मोरे ७०० डॉलर जिंकला असं अन्य कलाकारांनी सांगितलं. अमेरिकेत असताना वनिताच्या वाढदिवसानिमित्त सगळे कलाकार एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी असलेल्या कसिनोमध्ये खेळताना गौरव ७०० डॉलर जिंकला असं वनिताने सांगितलं पुढे ती म्हणाली गौरव इतका चांगला आहे त्याने आम्हा सगळ्यांना १०० १०० डॉलर वाटून टाकले.(gaurav more in london)