सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पुण्याचा जावई व्हायला आवडेल का?”, आदेश बांदेकरांच्या लेकाला प्रश्न विचारताच दिलं थेट उत्तर, सोहम म्हणाला, “एवढं पुण्य…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 6, 2024 | 1:36 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Soham Bandekar On Wedding

"पुण्याचा जावई व्हायला आवडेल का?", आदेश बांदेकरांच्या लेकाला प्रश्न विचारताच दिलं थेट उत्तर, सोहम म्हणाला, "एवढं पुण्य..."

मराठी कलाविश्वात बांदेकर कुटुंब हे नेहमीच चर्चेत असतं. आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर हे दोघेही गेली अनेकवर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. आपल्या अभिनयशैलीने सुचित्रा व आदेश यांनी आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सिनेसृष्टीतील आदर्श जोडीच्या यादीत सुचित्रा व आदेश यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. सोशल मीडियावरही ही जोडी नेहमीच चर्चेत असते. सुचित्रा व आदेश यांच्या पावलावर पाऊल टाकत आता त्यांचा लेकही सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करत आहे. सोहम बांदेकरनेही सिनेसृष्टीत आपली जागा मिळवायला सुरुवात केली आहे. (Soham Bandekar On Wedding)

‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सोहमने मालिकाविश्वात पदार्पण केले. याशिवाय सोहम ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातही पाहुणा कलाकार म्हणून दिसला. सोशल मीडियावर सोहम बऱ्यापैकी सक्रिय असतो, नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. बरेचदा हे बांदेकर कुटुंब एकत्र एकमेकांसह वेळ घालवतानाही दिसतात. अशातच सोहम अधूनमधून सेशन घेत चाहत्यांच्या संपर्कातही राहत असतो. अशातच सोहमने नुकताच ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी सोहमच्या चाहत्यांनी त्याला काही प्रश्न विचारले. या सगळ्या प्रश्नांवर सोहमने भन्नाट उत्तर दिली आहेत.

आणखी वाचा – “लग्नाआधी तीन वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिलो अन्…”, रोहित राऊत-जुईली जोगळेकरचा खुलासा, म्हणाली, “आमच्या आई-बाबांनी…”

सोहमला एका नेटकऱ्याने “पुण्याचा जावई व्हायला आवडेल का?”, असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्याने मिश्किलपणे उत्तर देत “मी एवढं पुण्य नाही केलं आहे”, असं म्हटलं आहे. याआधी सुद्धा एका नेटकऱ्याने “तुला लग्नासाठी कशी मुलगी हवी”, असा प्रश्न सोहमला विचारला होता. यावर त्याने “कशीही चालेल फक्त आईला आवडली पाहिजे”, असं उत्तर दिलं होतं.

आणखी वाचा – Video : असं आहे प्रविण तरडे यांचं घर, बायकोने शेअर केलेल्या व्हिडीओमधील ‘त्या’ गोष्टीने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

सध्या सोहम त्याच्या ‘सोहम प्रॉडक्शन’च्या कामात व्यस्त आहे. सध्या त्यांची ‘ठरलं तर मग’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिका सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नवीन मालिकेच्या लॉन्च सोहळ्यावेळी सोहम बांदेकर व त्याच्या आई-वडिलांना सुद्धा त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. तसेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या लगीनघाई सुरु आहे. यावेळी ही निर्माता म्हणून सोहम उपस्थित होता तेव्हा त्याला ‘इट्स मज्जा’ने लग्न कोर्ट मॅरेज करणार का?, की अरेंज मॅरेज?, असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत त्याने, कोर्ट मॅरेज करणार असल्याचा खुलासा केला.

Tags: aadesh bandekar and soham bandekaraadesh bandekar familysoham bandekarSoham Bandekar On Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
Naach Ga Ghuma and Juna Furniture movies box office collections see the details

बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची चर्चा, ‘जुनं फर्निचर’ व ‘नाच गं घुमा’ने आतापर्यंत किती कमावले?, एकूण कमाई तब्बल...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.