मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी यांच्याबरोबर मोठा फ्रॉड, पत्नी फोनवर बोलत असतानाच खात्यामधून लाखो रुपये गायब, नेमकं प्रकरण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 6, 2024 | 1:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rakesh bedi wife cyber fraud

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी यांच्याबरोबर मोठा फ्रॉड, पत्नी फोनवर बोलत असतानाच खात्यामधून लाखो रुपये गायब, नेमकं प्रकरण काय?

‘तेरी बातो मे ऐसा उलझा जिया’ या चित्रपटामधून अभिनेते राकेश बेदी खूप चर्चेत आले होते. आतापर्यंत त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘गदर’, ‘उरी’, ‘बिंदु की जवानी’ या चित्रपटांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पण आता ते अभिनयामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. राकेश यांची पत्नी आराधना बेदी या सायबर फ्रॉडच्या शिकार झाल्या आहेत. याबद्दलची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. (rakesh bedi wife cyber fraud)

मिळालेल्या माहितीनुसार राकेश यांची पत्नी आराधना ही सायबर फ्रॉडच्या जाळ्यात अडकल्या आहेत. त्यांची तब्बल ४.९८ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याबद्दल त्यांनी ‘इटाइम्स’बरोबर बोलताना सांगितले की, “एका नंबरवरुन कॉल आला होता. त्यामध्ये समोरची व्यक्ती म्हणाली की त्यांच्या खात्यांमध्ये चुकून पैसे जमा झाले आहेत आणि ते मिळवण्यासाठी ओटीपीची गरज पडेल. त्यानंतर खात्यातून मोठी रक्कम काढली गेली”. त्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिस तपास करत आहेत.

आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची चर्चा, ‘जुनं फर्निचर’ व ‘नाच गं घुमा’ने आतापर्यंत किती कमावले?, एकूण कमाई तब्बल…

View this post on Instagram

A post shared by Rakesh Bedi (@therakeshbedi)

याबद्दल राकेश यांनी आराधना यांना आलेल्या फोन कॉलवरुन समजले होते की हा फोन फसवणूक करणारा आहे. त्यामुळे त्यांनी लगेचच फोन कट केला होता. पण त्यांनी नंतर जेव्हा अकाऊंट चेक केले तेव्हा आकाऊंटमध्ये पैसे नव्हते.

आणखी वाचा – Video : किती गं बाई हुशार! सैफ अली खान व करीनाच्या लेकाने अवघड प्रश्नांची दिली लगेचच उत्तरं, आई-वडिलांनाही लेकाचा अभिमान

याबाबत ओशिवरा पोलिस स्थानकातील मोहन पाटील यांनी सांगितले की, “राकेश बेदी यांनी पैसे गेल्याची तक्रार दाखल केली आहे”. तसेच ते पुढे म्हणाले की, “आम्ही आता या सर्व प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पण हे प्रकरण थोडं गुंतागुंतीचं आहे. कोणत्याही माहितीशिवाय अकाऊंटमधून पैसे गेले आहेत. त्यामुळे आता आम्ही आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत”.  

याआधी राकेश यांचीदेखील अशीच फसवणूक झाली होती. त्यांच्या खात्यातून ७५ हजार रुपये काढले गेले होते. याची तक्रारदेखील त्यांनी ओशिवरा पोलिस स्थानकात नोंदवले होती.  

Tags: aaradhana bedicyber fraudrakesh bediwife
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Soham Bandekar talked about he will get married to the girl of his parents' choice and he will do court marriage

"आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करेन अन्...", आदेश बांदेकरच्या लेकाने सांगितलं कसं करणार लग्न?, म्हणाला, "कोर्टात जाऊन..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.