शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“किती पैसे हवेत?” धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनावेळी सनी देओलची पापाराझींवर संतप्त प्रतिक्रिया; कॅमेरा खेचला अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 4, 2025 | 1:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sunny Deol Angry On Paparazzi

पापाराजींवर सनी देओल भडकला

Sunny Deol Angry On Paparazzi : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर पापाराजींची उपस्थिती पाहायला मिळाली. धर्मेंद्र यांच्या प्रकृती खालावलेल्या दिवसांमध्येही पापाराजी सतत घराबाहेर थांबलेले दिसत होते, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना गोपनीयता राखणे कठीण झाले होते.

आता, धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन करताना पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांकडून गुप्तता ठेवण्यात आली होती.
सकाळी साडे नऊच्या सुमारास शांत वातावरणात अस्थी विसर्जनाची प्रक्रिया सुरू होती. मात्र, त्याच वेळी काही पापाराझी तिथे पोहोचले आणि फोटो व व्हिडीओ घेण्यास त्यांनी सुरुवात केली.

आणखी वाचा – ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन

View this post on Instagram

A post shared by Bollywood Feels (@bollywood__feels)

हे पाहताच अभिनेता सनी देओलचा राग अनावर गेला. दुःखाच्या क्षणी कुटुंबाला त्रास देत असलेल्या पापाराजींवर त्यांनी संताप व्यक्त केला. सनी देओल यांनी एका पापाराझीचा कॅमेरा हातातून घेऊन भडकला आणि म्हणाला, “तुम्ही लोकांनी लाज विकली आहे का? किती पैसे पाहिजेत?” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली. धर्मेंद्र यांच्या निधनानंतरचा हा प्रसंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक चाहत्यांनी अशा दुःखद प्रसंगी संयम राखण्याची आवश्यकता पापाराजींमध्ये असली पाहिजे असं मत व्यक्त केले आहेत.

आणखी वाचा – “तो दिवस नसता आला तर…”, पूर्णा आजीच्या आठवणीत सायली भावुक, मालिकेला तीन वर्ष पूर्ण होताच म्हणाली, “एक नकोशी आठवण…”

दुःखाच्या वेळेस कलाकारांना किमान पर्सनल स्पेस मिळाली पाहिजे, यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. धर्मेंद्र हे ८९ वर्षांचे होते आणि गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वस्थ होती. श्वसनास त्रास झाल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच निधन झालं.

Tags: bollywood newsentertainment newsSunny Deol Angry On Paparazz
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Tejaswini Lonari Wedding

शुभमंगल सावधान! तेजस्विनी झाली सरवणकरांची सून; लग्नातील पहिला फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.