सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शुभमंगल सावधान! तेजस्विनी झाली सरवणकरांची सून; लग्नातील पहिला फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 4, 2025 | 4:31 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tejaswini Lonari Wedding

तेजस्विनी-समाधान यांचा विवाह सोहळा संपन्न

Tejaswini Lonari Wedding : मराठी कलाविश्वात गेल्या अनेक दिवसांपासून बरेच कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसले. सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. त्याचबरोबर सुरज चव्हाण देखील लग्नबंधनात अडकला. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. अशातच आता आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. ती अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी लोणारी.

आणखी वाचा : “किती पैसे हवेत?” धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनावेळी सनी देओलची पापाराझींवर संतप्त प्रतिक्रिया; कॅमेरा खेचला अन्…

नुकताच तेजस्विनीचा विवाह सोहळा पार पडला असून तिच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे सुपूत्र आणि युवानेते समाधान सरवणकर यांच्याशी तेजस्विनीने लग्नगाठ बांधली आहे. मुंबईत तेजस्विनी आणि समधान यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. यावेळी अभिनेत्रीने गुलाबी रंगाची भरजरी साडी नेसली होती. या साडीवर साजेसा असा लूक तिनं केला होता. तर समाधान सरवणकर यांनी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

आणखी वाचा : जेवणाच्या वेळा चुकल्या, धावपळ-दगदग झाली आणि…; सूरज चव्हाणच्या लग्नानंतर जान्हवीची पहिली प्रतिक्रिया, हॉस्पिटलमध्ये दाखल…

मुंबईतील सहारा हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. तेजस्विनी-समाधान यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. तेजस्विनी-समाधान यांच्यावर सध्या कलाविश्वातून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऑक्टोबर महिन्यात तेजस्विनी आणि समाधान यांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्याचे फोटो बरेच व्हायरल झाले होते. त्यानंतर आता दोन महिन्यांनी तेजस्विनी लग्नबंधनात अकडली आहे. अभिनेत्री तेजस्विनी आता सरवणकरांची सून झाली आहे. दरम्यान, तेजस्विनीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

Tags: entertainmentmarathi actresstejaswini lonari
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Amol Naik Become Father

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता झाला बाबा; लेकीचं नावही ठेवलं खास, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.