गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तो दिवस नसता आला तर…”, पूर्णा आजीच्या आठवणीत सायली भावुक, मालिकेला तीन वर्ष पूर्ण होताच म्हणाली, “एक नकोशी आठवण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 4, 2025 | 10:50 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actress tharala tar mag

"तो दिवस नसता आला तर…", पूर्णा आजीच्या आठवणीत सायली भावुक, मालिकेला तीन वर्ष पूर्ण होताच म्हणाली, "एक नकोशी आठवण…"

marathi actress tharala tar mag : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. मालिकेने एक खास टप्पा गाठल्यानंतर स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर TTM मधील कलाकारांचे विविध व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. मालिकेतील कलाकारांनी या व्हिडीओद्वारे त्यांच्या तीन वर्षातील आठवणी सांगितल्या आहेत. यावेळी मालिकेतील कलाकारांनी पूर्णा आजी म्हणजेच दिवंगत अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची आठवण काढली. अभिनेत्री जुई गडकरी म्हणजेच सायली यावेळी खूप भावुक झाली. व्हिडीओद्वारे तिने यावेळी मनातील भावना व्यक्त केल्या.

जुई म्हणाली, “खूप असे किस्से आहेत, खूप असे दिवस होते, जे मी विसरु शकत नाही. पण यामधील सगळ्यात वाईट आठवण म्हणजे १६ ऑगस्ट २०२५ हा दिवस… हा दिवस आयुष्यात मी कधीच विसरणार नाही. कारण त्यादिवशी ज्योती ताई गेली. मला असं वाटतं की, तो दिवस नसता आला तर खूप बरं झालं असतं. कारण आम्हा सर्वांची तिच्याबरोबर खूप जास्त अटॅचमेंट होती, माझं आणि तिचं नातंही खूप वेगळं होतं. ती माझ्यासाठी खऱ्या आजीसारखी होती, ज्योती ताई माझी खूप चांगली मैत्रीण होती”.

आणखी वाचा – सूरजच्या लग्नात मिरवणं पडलं महागात, जान्हवी किल्लेकरची तब्येत बिघडली म्हणाली, “नजर…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

पुढे ती म्हणाली, “पूर्णा आजी आणि सायलीचे जे सीन व्हायचे त्यावरुन ऑनस्क्रीन सुद्धा तुम्हाला आमचं नातं कसं होतं हे दिसलं असेलच. ऑफस्क्रीन पण आमचं खूप छान एकमेकींशी नातं होतं, तिच्या जाण्याचा जो मला मॅसेज आला तो प्रसंग नाही आवडत. या 1000 एपिसोडच्या प्रवासातला तो दिवस जर पुसून टाकता आला असता किंवा तसं काही घडलं नसतं, तर बरं झालं असतं”.

आणखी वाचा – वेस्टर्न स्टाइल साडी अन् हिरव्या बांगडया; पूजा बिरारीने लग्नात परिधान केलेले दागिने होते फारच खास, नव्या नवरीचं खुललं सौंदर्य

शेवटी जुई म्हणाली, “आज 1000 भाग पूर्ण होत आहेत, हे बघायला ती हवी होती. त्यामुळे यानिमित्ताने जे काही छोटं-मोठं सेलिब्रेशन होईल, त्यात आम्ही तिला नक्की मिस करणार. कारण ती आमच्या मालिकेचा एक अविभाज्य घटक आहे. आजही आम्ही असं मानत नाही की, ती नाहीये. आम्हाला आजही असं वाटतं की, आजी आहे. तिचे आशीर्वाद नेहमी आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे तो एकच दिवस एक नकोशी आठवण आहे”.

Tags: jui gadkarijyoti chandekarmarathi actressTharla Tar Mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
 Tejaswini Lonari wedding

ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.