दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट गुरुवारी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी अवघं चित्रपटगृह डोक्यावर घेतलं असून चित्रपटाला दमदार ओपनिंग मिळाली आहे. आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार चित्रपटाने देशभरात पहिल्याच दिवशी ५० कोटींहून अधिक रुपयांची कमाई करत या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट ठरला आहे. (Jailer Box-Office Collection)
सॅकनिल्कच्या समोर आलेल्या अहवालानुसार, चित्रपटाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी जेलरने देशभरात एकूण ५२ कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये तामिळनाडूमध्ये २३ कोटी, कर्नाटकमध्ये ११ कोटी, केरळमध्ये ५ कोटी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून १० कोटींची कमाई केली आहे, तर इतर राज्यात ३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
याबरोबरच ‘जेलर’ चित्रपट तमिळनाडू आणि केरळमध्ये यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे. शिवाय तो देशभरात सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला तमिळ चित्रपट ठरला आहे. याआधी हा विक्रम मणी रत्नम यांच्या ‘पोनियन सेल्वन २’ या चित्रपटाच्या नावावर होता, ज्याने ३२ कोटी रुपयांची कमाई केली होती.
हे देखील वाचा – २० वर्ष वडिलांच्या प्रेमासाठी झगडतेय ‘बिग बॉस ओटीटी’ फेम जिया शंकर, म्हणाली, “त्यांनी दुसरं लग्न केलं आणि…”
हे देखील वाचा – रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट पाहण्यासाठी ‘या’ शहरांमध्ये ऑफिस कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर, तिकिटेही मिळाली फ्री
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, एकट्या तामिळनाडू राज्यातील ९०० स्क्रीन्सवर हा चित्रपट दाखवला जात असून दक्षिण भारतात तब्बल ९ लाख तिकिटांची विक्री झाली आहे. तब्बल २ वर्षांनी रजनीकांतला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या निमित्ताने चाहते आनंद साजरा करत आहेत. (Rajinikanth’s Jailer Box-Office Collection Day 1 Out)
हे देखील वाचा – ‘या’ कारणांमुळे ‘बार्बी’वर कुवैतमध्ये बंदी; लेबनॉनमध्येही चित्रपट न दाखवण्याचा निर्णय होणार?
नेल्सन दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत एका जेलरच्या भूमिकेत असून त्यांच्यासह मोहनलाल, शिवा राजकुमार, जॅकी श्रॉफ, राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, योगी बाबू यांच्याही भूमिका आहेत. चित्रपट तमिळ, हिंदी व अन्य भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.